Download App

बापूसाहेब पठारे यांचे इऑन ग्यानांकुर शाळा खराडी येथे सपत्नीक मतदान

Bapusaheb Pathare : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे (Vadgaon Sheri Assembly Constituency) महाविकास आघाडीचे (MVA) अधिकृत उमेदवार

  • Written By: Last Updated:

Bapusaheb Pathare : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे (Vadgaon Sheri Assembly Constituency) महाविकास आघाडीचे (MVA) अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी खराडी येथील इऑन ग्यानांकुर शाळा या ठिकाणी सकाळी 7 वाजता मतदान केले. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ.संजिला पठारे (Sanjila Pathare) होत्या.त्यानंतर त्यांनी विविध बूथ आणि मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.

पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना बापूसाहेब पठारे म्हणाले,’उज्ज्वल व अव्वल महाराष्ट्रासाठी मतदानाचा हक्क, अधिकार, कर्तव्य बजावले आहे. लोकशाहीला सशक्त बनवण्याच्या या प्रक्रियेत सहभागी होताना आनंद होतोय.

राज्यात यंदा परिवर्तन अटळ असणार आहे आणि लोककल्याणासाठी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, हा विश्वास आहे. आज सर्व मतदान केंद्रांवर उत्साह दिसत होता.मतदानाचा टक्का वाढणार आहे,परिवर्तनाची लाट आल्याचे सहज लक्षात येत आहे’. ‘येणारा काळ हा माझ्या वडगावशेरी मतदारसंघासाठी व महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ ठरावा, यासाठी मी प्रयत्नशील असेलच.

शेवटच्या टप्प्यात ट्विस्ट! सोलापुरात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अपक्षाला पाठिंबा; ठाकरेंच्या अडचणी वाढणार

या आधी म्हणल्याप्रमाणे, ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. लोकशाहीचा अर्थच जनतेने, जनतेच्या हितासाठी, जनतेकरवी चालवलेले राज्य असल्याने जनतेचे राज्य येईल’,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यात आज 4, 136 उमेदवारांचं भवितव्य पणाला; 9.7 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

follow us