Sanjay Kakade : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elecion) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची (Sharad Chandra Pawar party) तुतारी हातात घेण्यासाठी राज्यातील अनेक बडे नेते तयारीत आहेत. अशाच आता माजी राज्यसभा खासदार आणि भाजप नेते संजय काकडे (Sanjay Kakade) हे देखील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पवेश करणार असल्याची चर्चा आहे. खुद्द काकडेंनी याबाबत माहिती दिली.
Eknath Shinde यांना मोठा धक्का; विजय नाहटा तुतारी फुंकणार
मी दसऱ्यानंतर शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. माझ्यासोबत 3-4 आमदार आणि पुण्यातील 22 नगरसेवक सुद्धा प्रवेश करणार असल्याचं काकडे म्हणाले.
माझा केवळ वापर झाला…
संजय काकडे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. आजही माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी पुन्हा एकदा नाराजी बोलून दाखवली. काकडे म्हणाले की, गेल्या दहा वर्षात मी पक्षासाठी माझ्यापरीने सर्वतोपरी योगदान दिले आहे. मात्र, माझ्या कामाची दखल घेतली गेली नाही. माझा केवळ वापर करून घेण्यात आला आहे. भाजपमधील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढं ते म्हणाले की, मी दसऱ्यानंतर शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. माझ्यासोबत 3-4 आमदार आणि पुण्यातील 22 नगरसेवक सुद्धा माझ्यासोबत प्रवेश करणार आहे. तसेच माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची 15 वर्षांपासून मैत्री आहे. त्यामुळे मी औपचारिकता म्हणून देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन माझा निर्णय त्यांना सांगणार असल्याचं काकडे म्हणाले.
दरम्यान, संजय काकडे यांच्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र संजय काकडे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीत फडणवीस हे संजय काकडे यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, काकडे यांनी भापजला सोडचिठ्ठी दिली तर ते कोल्हापुरातील समरजितसिंह घाटगे आणि इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे भाजपचे तिसरे महत्वाचे नेते ठरणार आहेत. हे पक्षांतर भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.