Bapusaheb Pathare : रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्या पुढाकाराने रविवारी (ता. 17) प्रशांत (लुकस) केदारी यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नगर-पुणे रोड येथील सहारा रेस्टोरंट येथे सदर मेळावा पार पडला. समाजाच्या मेळाव्यात सर्व पंथीय धार्मिक व राजकीय नेते, सर्व पदाधिकारी हजर होते.
ख्रिस्ती समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करुन त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापुसाहेब पठारे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी पार पडलेल्या चर्चासत्रात, लुईस तेलोरे, शार्लिन, बिशप थाँमस, पा.पिटर जाँर्ज, बिशप अश्विन, पिटर रोड्रिक्स, दिपक साठे, मा.नगरसेवक अश्विनी लांडगे, पद्माकर पवार,अंटन कदम, राजन नायर, पिटर डिसूझा, जॉन फर्नांडिस, सुधीर हिवाळे, अंतोन त्रिभुवन, जॉन मनतोडे, जेडी आढाव, महिला आघाडीच्या संयोजक प्रतिमा केदारी, राँबिन मुन्तोडे, मेरी परगे, फेबियन सॅमसन, सलूमी तोरणे, विल्सन भोसले, रश्मी कलसेकर, अलीस लोबो, सुलभा कांबळी, पा. मुरली नायर, नितीन भोसले, रतन ब्राम्हणे, अविनाश भाकरे जॉन केदारी, अरुण केदारी, दिलीप घुटे, अलिशा, जोसेफ साखरे यांच्यासह वडगावशेरी मतदारसंघातील सर्व ख्रिस्ती संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, धर्मगुरू यावेळी उपस्थित होते. समाजाचे राजकीय नेते व रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे संस्थापक प्रशांत केदारी यांनी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे तसेच आर्थिक विकास महामंडळ, विधानमंडळ सदस्यत्व, समित्यांमध्ये संधी मिळावी, अशी मागणी केली. अश्विनी लांडगे यांनी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी ख्रिस्ती समाजाला सहकार्य करावे, असे सांगितले.
नोटिशीला घाबरत नाही, निष्पापांना न्याय मिळाला पाहिजे, सुषमा अंधारेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल
दीपक साठे यांनी त्यांच्या मनोगतात प्रशांत केदारी यांचे मेळावा नियोजनाबद्दल आभार मानले व ख्रिस्ती समजावर अन्याय अत्याचार थांबवा, असे आवाहन केले. युवा नेते सुरेंद्र पठारे यांनी समस्या जाणून घेत यावर मार्ग काढला जाईल व भविष्यात समाजाला नक्की प्रतिनिधित्व मिळेल, असे आश्वासित केले. यावेळी सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने बापुसाहेब पठारे यांना जाहिर पाठिंबा दर्शवला. मतदानात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.