“मी मु्ख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही”, फडणवीसांनंतर अजितदादांनीही केलं क्लिअर

मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar

Ajit Pawar

Ajit Pawar on Chief Minister Post : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना निवडणुकीला सामोरे जात आहेत. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीत या मुद्द्यावर जास्त धुसफूस दिसून येत होती. परंतु, काँग्रेस आणि शरद पवार गटाने उद्धव ठाकरेंच्या मागणीला महत्व न दिल्याने हा मुद्दा मागे पडला होता. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केलं होतं. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या मुद्द्यावर निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना, पण मी..” फडणवीसांनी काय सांगितलं?

राज्यात विधानसभा निवडणुकी सुरू आहेत. महायुतीला 175 चा आकडा पार करणं अवघड असावं. निकाल आल्यानंतर मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यात येईल. अजित पवार पुढे म्हणाले, मला अनेक मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. माझ्या मते दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते. विलासरावांनी आघाडी सरकारचं नेतृत्व करण्याची नेतृत्व करण्याची रणनीती तयार केली होती अशा शब्दांत अजित पवार यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं कौतुक केलं.

 

Exit mobile version