Download App

धुळे जिल्ह्यातील पाचही उमेदवार निवडून येणार, देवेंद्र फडणवीसांचा PM मोदींना शब्द

Devendra Fadnavis Sabha for Mahayutti candidates : धुळे जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी आता दिग्गज मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) धुळ्यात जाहीर सभा घेत आहे. मोदींच्या प्रचाराची सुरूवात आज धुळ्यातून झालीय. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढील 5 वर्षात मोदींजींच्या कामामुळे धुळे (Dhule) जिल्हा राज्यातील एक नंबरचा जिल्हा होणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवण्याचं काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली होतंय. तसंच रेल्वेचं एक सेंटर सुरू होतंय, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सरदेसाईंच्या पुस्तकात सुनेत्रा पवारांचंही नाव, सुप्रिया सुळे भडकल्या; फडणवीसांवर आगपाखड

मोदीजींनी सहा राष्ट्रीय महामार्ग धुळ्याला दिले, असं फडणवीस म्हणाले आहेत. धुळे जिल्ह्यातील पाचही महायुतीच्या जागा निवडून येणार, असा शब्द फडणवीसांनी मोदींना दिलाय. लाडक्या बहिणी, लखपती दिदी योजना शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्ती शेतकऱ्यांना महायुती सरकारने दिलीय. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार आल्यास कर्जमाफीचा निर्णय सरकारने (Assembly Election 2024) घेतलेला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
धाराशिवच्या तरुणांसाठी आता जिल्ह्यातच रोजगार; राणाजगजितसिंह पाटलांनी दिली नव्या प्रकल्पांची माहिती

लाडक्या भावांना दहा लाख रोजगाराच्या संधी देत आहोत. एकीकडे सर्व जातीधर्मांना सोबत घेवून विकास करत आहेत, दुसरीकडे विरोधक धुळे जिल्ह्यात विरोधक वोट जिहाद करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.धुळ्याच्या लोकसभेत काही मतांनी वोट जिहादमुळे पराभूत झालो. म्हणून मी आता तुम्हाला जागं करण्यासाठी आलो आहे. आता जागे झालो नाही तर कायमस्वरूपी झोपावं लागेल. ही निवडणूक जागं होण्याची आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

धुळे शहरात अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणमध्ये राम भदाणे (भाजप), शिंदखेडात जयकुमार रावल (भाजप), शिरपूरमध्ये कांशीराम पावरा (भाजप) आणि साक्री
विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या मंजुळा गावित या रिंगणात आहेत. आज धुळ्यात या पाचही उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होऊन महायुतीचं महाराष्ट्र मिशन देखील सुरू झालंय.

 

follow us