धाराशिवच्या तरुणांसाठी आता जिल्ह्यातच रोजगार; राणाजगजितसिंह पाटलांनी दिली नव्या प्रकल्पांची माहिती
Ranajagjitsinh Patil Exclusive : स्टेक्स्टाईल पार्कमधून कसे उद्योग मिळतील याबाबात बोलताना, मला जास्तीत जास्त उद्योग धाराशिव जिल्ह्यात आणायचे होते. अनेक व्यावसायिकांशी बोलण झालं होतं. (Ranajagjitsinh) मी त्यावेळी राज्यमंत्री होतो. फक्त स्टेक्स्टाईल पार्क नाही तर टेक्निकल स्टेक्स्टाईल हे देशातील पहिला प्रकरल्प इथ करण्याचं बोलण झालं होत. त्याला परवानगीही मिळाली होती. परंतु, ठाकरे सरकारच्या काळात काही हालचाल झाली नाही. पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांनी विधानसभेत घोषणा केली अशी माहिती राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ते लेट्सअस मराठीवर लेट्सअप चर्चा या विशेष भागात बोलत होते.
स्टेक्स्टाईल प्रकल्पातून किमान 10 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल असंही राणा पाटील यावेळी म्हणाले आहेत. तसंच, ताम्हणवाडी येथे 370 एकर क्षेत्रावर कंपनी स्थापन करण्यासाठी उद्योजक तयार आहेत. सोलापूर येथी काही व्यावसायिकांशी चर्चा झाली आहे. येथे कंपनी स्थापन झाली तर सुमारे 12 हजार लोकांना रोजगार मिळेल असंही राणा पाटील यावेळी म्हणाले आहेत. तसंच, टेक्स्टाईल प्रकल्पाच्या आगोदर हा प्रकल्प उभा राहील असंही ते म्हणाले आहेत.
मी राजकारणात येणार नाही असं ठरलं होतं; पण.. राणाजगजितसिंह पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी
तुळजाभवानी मंदिर प्रकल्पात सुमारे दोन हजरा कोटी रुपयांची गुंतवणूक आपण करणार आहेत. त्यामध्ये 60 कोटींची कामं सुरू झाले आहेत. त्यामध्ये कमान बनवण्याचं काम सुरू झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वेगवेगळे काम आहेत ते सर्व आपण मार्गी लावत आहोत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनीही मदत केली आहे असंही ते म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी नवीन मतदारांवरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आपल्याला कोणता उमेदवार योग्य वाटतो. आपले कोण प्रश्न सोडवेल असं आपल्याला वाटत त्यांनी तो निर्णय घ्यायला हवा असंही ते म्हणाले. त्याचबरोबर आपण बाहेर जे तरुण आहेत त्यांच्यासाठी धाराशिव जिल्ह्यातचं कसा रोजगार निर्माण होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामध्ये लवकरच तोडगा निघेल असंही राणा पाटील यावेळी म्हणाले आहेत.