ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय; तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपमध्ये, सुळेंच फडणवीसांना पत्र
Supriya Sule यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजप प्रवेश दिल्याने चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.
Drug smuggling is getting royal protection; Accused in Tuljapur drug case joins BJP, Supriya Sule writes a letter to CM Devendra Fadnavis : तुळजापूरमध्ये मोठं ड्रग्ज प्रकरणं मागील काही दिवसांपूर्वी उघडकीस आलं होतं. त्यातील आरोपी संतोष परमेश्वर हा सध्या जामीनावर सुटलेला आहे. मात्र या आरोपीला भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. हाच आरोपी राष्ट्रवादी एकत्र असताना तुळजापूरचा नगराध्यक्ष होता. त्यावरून शरद पवार पक्षाच्या खासदार यांनी चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.
सुप्रिया सुळेंचं पत्र नेमकं काय ?
या पत्रामध्ये सुळे म्हणाल्या की, तुळजापूर शहरातील काही जणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले. याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली.
पार्थ पवार व्यवहार रद्द करु शकत नाही, अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानियांची मागणी
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते, याबाबत आपणही सहमत असाल. आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे.
इंडियन आयडॉलवर जसपिंदर नरूला झाल्या भावूक: आठवलं पाहिलं गाणं
समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते. तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल अशी अपेक्षा आहे. असं म्हणत सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.
