Download App

’15 रुपयांचा वडापाव ते 50 हजारांचा सूट..’ उमेदवारांसाठी आयोगाने रेटकार्डट दिले

विधानसभा निवडणूक लढविताना उमेदवाराने प्रचारासाठी किती खर्च करावा, याची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला 40 लाख रुपये खर्च करण्याचे निर्देश आहेत. हे 40 लाख रुपयांमध्येही कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये खर्च करावा याबाबतचे आयोगाने सविस्तर दरपत्रकच जारी केले आहे. चहा, नाष्टा, जेवण आणि गाडी खर्चासोबत व्हीआयपीसाठी देण्यात येणाऱ्या हार-बुकेसाठी किती खर्च केला जावा, याचे काटेकोर नियोजनही आखून दिले आहे. याच आदर्श दरपत्रकानुसार खर्च करून त्याचा हिशेब आता प्रत्येक उमेदवाराला सादर करावा लागणार आहे.

आयोगाने ठरवून दिल्यानुसार, चहा 10 रुपये, कॉफी 12 रुपये, नाष्टा 38 रुपये, वडापाव – 15 रुपये, शाकाहारी जेवण 110 रुपये, मासांहारी जेवण 140 रुपये, पुलाव 75 रुपये, पुरी भाजी 60 रुपये, पाणी जार 20 लिटरचा 80 रुपये प्रतिदिन आणि प्रतिमाणसी खर्च करावा लागणार आहे. (Every candidate will now have to submit an account of the expenditure as per the tariff set by the Election Commission)

सभेदरम्यान किती खर्च करावा हेही आयोगाने सांगितले आहे. यात प्लास्टिक खुर्ची प्रतिदिन 10 रुपये, यु पिन बॉक्स सहा रुपये, काडे पेटी एक रुपया, खर बँड 10 रुपये, जनरेटर 125 केव्ही 15 हजार रुपये प्रतिदिन, व्हीव्हीआयपी बुकेसाठी एक हजार रुपये, व्हीआयपी पुष्पहार 12 फुटी डबल दोन हजार रुपये, एक फुटापर्यंतचा पार्टी झेंडा प्रतिनग 25 रुपये, दोन फुटापर्यंत पार्टी झेंडा प्रतिनग 50 रुपये, टोपी प्रतिनग 12 रुपये, स्कार्फ प्रतिनग 10 रुपयांपर्यंत, ढोल-ताशा पथक प्रतिमाणसी एक हजार रुपये, बँड पथक 1200 रुपये प्रतिमाणसी खर्च करण्याची मर्यादा घालून दिली आहे.

राज्यातील 73 विधानसभेच्या जागा ठरणार सत्तांतरासाठी ‘टर्निंग पॉईंट’; जाणून घ्या, मायक्रो समीकरण

याशिवाय प्रतिदिन राहण्यासाठी किती खर्च करावा याचेही दरपत्रक आयोगाने ठरवून दिले आहे. यात नॉन एसी हॉटेलसाठी 1650 रुपये, एसी हॉटेलसाठी तीन हजार रुपये, फोर स्टार हॉटेल सूट 20 हजार रुपये, फाईव्ह स्टार हॉटेल सूट 50 हजार रुपये प्रतिदिन खर्च करण्याची मर्यादा आहे. प्रवासासाठीचा खर्चही आयोगाने ठरवून दिला आहे. यात ड्रायव्हर 18 हजार रुपये प्रतिमहिना, 50 आसनी बस प्रतिदिन 100 किलोमीटर 11 हजार 500 रुपये, नॉन एसी टॅक्सी 24 तासासाठी 100 किमी प्रतिदिन 2770, एसी-टॅक्सी 24 तासासाठी 100 किलोमीटर प्रतिदिन 2960, इनोव्हा एसी 24 तासांसाठी 100 किलोमीटर प्रतिदिन 5 हजार रुपये एखाद्या उमेदवाराला खर्च करता येणार आहेत.

सोन्यात 6 कोटींची गुंतवणूक अन् 182 कोटी रुपयांचे कर्ज, मंगलप्रभात लोढांची संपत्ती जाणून घ्या

ठरवून दिलेल्या रकमेतच उमेदवार खर्च करतात का? यावर निवडणूक आयोग तर लक्ष ठेवून असतोच. दररोज होणारा खर्च आयोगाला सादर करावा लागत असतो. पण विरोधी उमेदवारही एकमेकांच्या खर्चाकडे लक्ष ठेवून असतात. काही वेळा अनेक उमेदवार विरोधी उमेदवाराच्या अतिरिक्त खर्चाच्या मुद्द्यावरून आयोगाकडे तक्रार करतात. आयोग त्याबाबत यंत्रणेला शहानिशा करण्याची सूचना देतो. निवडणूक आयोगाच्या अॅपवरूनसुद्धा सामान्य नागरिक त्यांना काही चुकीचे घडत असल्याचे दिसल्यास आयोगाकडे तक्रार करू शकतात.

follow us