हेमंत रासनेंचा धंगेकरांना धक्का, कसब्यात मारली बाजी

Maval Assembly Result : मावळ विधानसभा मतदारसंघातात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

Hemant Rasnes

Hemant Rasnes

Kasab Assembly Result : कसाब विधानसभा मतदासंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कसाब विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने 19,320 मतांनी विजयी झाले आहेत.

मावळ विधानसभा मतदारसंघातात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. सुनील शेळके यांना 25 व्या फेरी अखेरीस 98250 मतांनी आघाडी घेतली आहे. तर बापूसाहेब भेगडे अपक्ष उमेदवार यांना 69022 मते मिळाली आहे.

पुण्यात विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला मोठा धक्का बसला आहे. पुण्यात पुन्हा एकदा अजित पवार यांनी आपलं वर्चव्य सिद्ध केले आहे.

तर दुसरीकडे बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी तब्बल 49 हजारांची आघाडी घेतली आहे. बारामती विधानसभा दहावी फेरी अखेर अजित पवार यांनी 49188 मतांनी आघाडी घेतली आहे.

Exit mobile version