‘सुनील शेळकेंचं निष्ठेनं काम करा’; भाजप कार्यकर्त्यांना पक्षाचा आदेश
Sunil Shelke : महायुतीत (Mahayuti) सर्वात चर्चेत राहिलेल्या मावळ मतदारसंघात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी पदाचा राजीनामे देऊन अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होता. दरम्यान, आता कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाला. आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी त्यांना मतदान करण्याचे आवाहन भाजप पक्षश्रेष्ठींकडून केले गेले.
किशोर आवारे खून प्रकरणी आमदार सुनील शेळके म्हणतात, मी लढाईला तयार
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी महायुतीच्या उमेदवारांचं काम करण्याचे आदेश भाजप कार्यकर्त्यांना दिलेय. पाडे यांनी मतदारांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळं मावळातील भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विजयासाठी समर्पित भावनेनं काम करावे, अशी स्पष्ट सूचना पांडे यांनी दिल्यात.
Kasba Chinchwad Election राजकीय वातावरण तापलं; नेमकं काय म्हणाले आमदार सुनील शेळके ?
मावळातील भाजपचे काही नेते पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दिशाभूल करून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचा जाहीर प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश कार्यालयाने एका पत्राद्वारे पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे तालुक्यातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला असून सर्वजण महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत. केवळ भाजप उमेदवारच नव्हे तर युतीतील मित्रपक्षांचे उमेदवार लढत असलेल्या मतदारसंघातही भाजप कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी समर्पित भावनेनं काम करावं. आपल्या सर्वांच्या कठोर मेहनतीमुळे राज्यात महायुती नक्कीच विजयी होईल, असे पांडे यांनी पत्रात म्हटले आहे.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क साधला. मावळातील भाजप कार्यकर्ते हे पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षाच्या आदेशाचे पालन करतात. त्यामुळे या निवडणुकीतही ते महायुती धर्माचे पालन करतील, अशी ग्वाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वतीने दिली.