किशोर आवारे खून प्रकरणी आमदार सुनील शेळके म्हणतात, मी लढाईला तयार

  • Written By: Published:
किशोर आवारे खून प्रकरणी आमदार सुनील शेळके म्हणतात, मी लढाईला तयार

Kishor Aaware murder case : तळेगांव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. त्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांना सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किशोर आवारे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तरी औपचारिकता म्हणून रुग्णालयामध्ये दाखल केले होते.

दरम्यान आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. किशोर आवारेंच्या आईने धक्कादायक आरोप केले होते. आवारे त्यांच्या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला होता असं आवारे यांच्या आईने आरोप केला होता. त्यानुसार आवारे खुन प्रकरणी सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, शाम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्यानंतर सुनील शेळके म्हणतात..किशोर आवारे आणि माझ्यात मतभेत जरूर होता परंतु आमच्यात मनभेद नव्हता. कृपया किशोर आवारेंच्या खुनाचे कोणी राजकारणकरू नये. जे कोणी खुनी असेल त्याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. माझ्या आणि माझ्या भावा विरोधात खोटी तक्रार आवारेंच्या कुटुंबीयांनी दिली आहे, मी त्यांचा संताप समजू शकतो परंतु हा मला जाणीव पूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व घटनांचा तपास मी केल्या शिवाय शांत बसणार नाही. असे आमदार सुनील शेळके म्हणाले ते गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

किशोर आवारे खून प्रकरणी मोठी अपडेट, पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले

जर मला कोणी असं बदनाम करून राजकारणा पासून दूर करण्याचा प्रयत्न करत असेल तर आज माझ्या पदाचा राजीनामा देण्यासाठी तयार आहे. परंतु मला हे माझ्या माय- बाप जनतेने सांगणं गरजेचं आहे कारण त्यांनी मला निवडून दिल आहे. या प्रकरणी मी प्रत्येक चौकशीला समोर जाण्यासाठी तयार आहे. मी आज पर्यंत कोणाला थप्पड मारली असा गुन्हा राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात दाखवावा असे आवाहन सुनील शेळके यांनी यावेळी केली.

तसेच माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे कि या प्रकरणाची सखोल चौकशी करा तसेच या प्रकरणाच्या माघून कोणी जर राजकारण करत असेल तर त्यांची पण चौकशी पोलिसांनी केली पाहिजे असे आमदार सुनील शेळके म्हणाले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube