Kasba Chinchwad Election राजकीय वातावरण तापलं; नेमकं काय म्हणाले आमदार सुनील शेळके ?
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये (Chinchwad Bypoll Election) राष्ट्रवादी उमेदवार आयात करेल, असा सूचक विधान आमदार सुनील शेळके (sunil shelke) यांनी केल. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसने सुनील शेळकेंवर चिंचवड विधानसभेची जबाबदारी टाकल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. तेव्हा स्थानिकांनी आयात उमेदवार दिला तर प्रचार करणार नाही अशी भूमिका मांडली. मात्र त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार आयात करेल, असा इशारा स्थानिकांना दिला आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेसचा उमेदवार हा घड्याळ असेल”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी उमेदवार आयात केला जाईल असाच सूचक इशारा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील शेळकेंवर चिंचवड विधानसभेची जबाबदारी टाकलेली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (5 जानेवारी) बैठक पार पडली. स्थानिक आयात उमेदवार दिला, तर प्रचार करणार नाही, असा सूर बैठकीत सांगण्यात आलं.
शिवसेनेचे राहुल कलाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे दार ठोठावत असल्यानं हा रोष बैठकीत दिसून आला. दरम्यान यावर बोलताना शेळके म्हणाले, ‘राहुल कलाटे बाहेरचे नसून महाविकास आघाडीमधील आहेत आणि विजयी उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यामुळे कलाटेंनाच संधी मिळू शकणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिलीये. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकजण इच्छुक असले तरी पक्षाकडून माजी शिवसैनिकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आमदार सुनील शेळके यांनी याबद्दल सूचक विधान केलं आहे.