Shivajirao Kardile : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रचारासाठी अवघ्या काही दिवस शिक्कल असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. तर दुसरीकडे नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) विरुद्ध माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) अशी लढत पाहायला मिळत आहे.
आज शिराळ चिचोंडी येथे आ. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आठवण करुन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले भावुक झाले.
या सभेत बोलताना शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, मतदार संघ पुनर्रचनेत तुकडे झाले त्यामुळे माझे राजकारण संपले असे वाटले होते मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी 2009 मला भाजपची उमेदवारी दिली व मी आमदार झालो. त्या माध्यमातून राहुरी मतदार संघातील नागरिकांना विकास काय असतो हे दाखवून दिले. असं शिवाजी कर्डीले म्हणाले.
तसेच तीस वर्षापासून सुरू असलेल्या जनता दरबारामध्ये कोणीही प्रश्न घेऊन येतात आणि ते मी सोडवितो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात डीपी बंद करून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात होते. मात्र महायुती सरकारने शेतकऱ्यांना वीज माफ करून मोफत वीज देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक रुपया पिक विमा काढला आणि लाखो रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. पालकमंत्री व माजी खासदार विखे यांनी ठरवले तर नगर जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं शिवाजीराव कर्डिले म्हणाले.
तर या सभेत बोलताना आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीमध्ये माझा व माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव फेक निगेटिव्हमुळे झाला. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक शौचालय, गॅस सिलेंडर, शेतकरी सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना यशस्वीपणे राबवलली आहे. देशात नरेंद्र मोदीचे सरकार असून महाराष्ट्रात देखील महायुतीचे सरकार आणायचे आहे. लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहण्यासाठी नगर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा. भाऊ एक वेळेस बहिणीला सोडत असतो मात्र बहीण कधीही भावाला सोडत नसते. विरोधकांना चांगले सरकार चालवता येत नाही.
शिवाजीराव कर्डिलेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी तुफान गर्दी, पंकजा मुंडेंनी सभा गाजवली
नगर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी माझी आहे. म्हणून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यासारख्या हुशार पैलवानला निवडून द्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे आमदार, खासदार बनवणारी फॅक्टरी होती. विरोधक सविधान जातियवाद यावर अफवा पसरवतात या गोष्टीवर विश्वास न ठेवता विकासाच्या कामाला मतदान करा असे आवाहन भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी केले.