मी कामाचा माणूस, पाणी योजनेचे थकीत बिल माफ करून योजना सुरू केली; शिवाजीराव कर्डिले

  • Written By: Published:
मी कामाचा माणूस, पाणी योजनेचे थकीत बिल माफ करून योजना सुरू केली; शिवाजीराव कर्डिले

 

Shivajirao Kardile : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक प्रचाराला आता वेग आला. राहुरी विधानसभेचे भाजप उमेवदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनीही मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरूवात केली. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना बारागाव नांदूर परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने राबवीत असताना नियमात बसत नसलेली कामे नियमात बसवून दिली आणि जनतेला लाभ मिळून दिला, असं प्रतिपादन कर्डिले यांनी केलं.

संग्राम जगतापांना भाजपकडून समर्थन, आगरकर म्हणाले विजयी भव…

मी कामाचा लोकप्रतिनिधी आहे. बारागाव नांदूर पाणी योजनेचे वीज बिल थकीत होते. ते माफ करून १७ गावांची योजना सुरू केली, असंही कर्डिले म्हणाले.

कर्डिले यांनी बारागाव नांदूर, कुरणवाडी, चिंचाळे, गड आखाडा, घोरपडवाडी, मल्हारवाडी, मोमिन आखाडा, बोरटेक परिसरात प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, विक्रम तांबे, प्रभाजी सूळ, सारंगधर पवार, ज्येष्ठ नेते कैलास पवार, युवराज गाडे, राजेंद्र गोपाळे, रखमा खिलारी, सुरेश बांदकर, नसीर शेख, भारत जाधव, अण्णासाहेब भास्कर, साहेबराव शिंदे, सयाजी श्रीराम, अशोक घाडगे, संदीप गाडे, शिवाजी सागर, रघुराम शिंदे, बाबासाहेब धोंडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवाजी गाडे यांच्यामुळेच मी आमदार
यावेळी कर्डिले म्हणाले, शिवाजीराव गाडे हे स्वाभिमानी नेते होते. सर्वसामान्य जनतेच्या सुख- दुःखात जाऊन प्रश्न सोडविण्याचे काम करत असल्यामुळेच जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. त्याचा राग धरून गाडे कुटुंबीयांना संपविण्याचे काम काही लोकांनी केले. गेल्या दहा वर्षांमध्ये आदिवासी समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावले. दिवंगत शिवाजी गाडे यांच्यामुळेच मी आमदार झालो.

अमरावतीतील तीर्थस्थानांचा चेहरा-मोहरा बदलणार; यशोमती ठाकूर यांची ग्वाही

तर धनराज गाडे म्हणाले, माजी मंत्री कर्डिले यांनी कधीही विकासकामात राजकारण केले नाही. त्यांनी विरोधकांचीही कामे केली. शेतकरी मंडळ माजी मंत्री कर्डिले यांच्या पाठीमागे उभे आहे, असं गाडे म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube