Download App

मोठी बातमी! बीड जिल्ह्यात मतदान केंद्रावरच अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यसभरात आज विधानसभेसाठी मतदान सुरु आहे. तर दुसरीकडे बीड (Beed) जिल्ह्यातून एक मोठी बातमी

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यसभरात आज विधानसभेसाठी मतदान सुरु आहे. तर दुसरीकडे बीड (Beed) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बीड जिल्ह्यात मतदानकेंद्रावर अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे (Balasaheb Shinde) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदार केंद्रावर थांबले होते यादरम्यान त्यांना चक्कर आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शहरातील काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तर दुसरीकडे दुपारी तीनपर्यंत बीड जिल्ह्यात 46.15 टक्के मतदान झाला आहे. तर संपूर्ण राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान झाले आहे. बीड विधानसभा मतदारसंघात यावेळी मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसून येत आहे. महायुतीकडून योगेश क्षीरसागर तर महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मात्र मनोज जरांगे पाटील समर्थक अनिल जगताप यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने यावेळी बीड विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

राज्यात दुपारी तीनपर्यंत सरासरी 45 टक्के मतदान

अहिल्यानगर : 47.85

अकोला : 44.45

अमरावती : 45.13 टक्के

छ. संभाजीनगर : 47.05 टक्के

बीड -46.15 टक्के

भंडारा- 51.32 टक्के

बुलढाणा-47.48 टक्के

चंद्रपूर-49.87 टक्के

धुळे -47.62 टक्के

गडचिरोली-62.99 टक्के

गोंदिया -53.88 टक्के

हिंगोली-49. 64 टक्के

जळगाव -40.62 टक्के

जालना- 50.14 टक्के

कोल्हापूर-54.06 टक्के

लातूर-48.34 टक्के

मुंबई शहर- 39.34 टक्के

मुंबई उपनगर-40.89 टक्के

नागपूर – 44.45 टक्के

नांदेड – 42.87टक्के

नंदुरबार- 51.16 टक्के

नाशिक -46.86 टक्के

धाराशिव- 45.81 टक्के

पालघर- 46.82 टक्के

परभणी- 48.84 टक्के

पुणे – 41.70 टक्के

रायगड-48.13 टक्के

रत्नागिरी- 50.04 टक्के

सांगली – 48.39 टक्के

सातारा – 49.82 टक्के

सिंधुदुर्ग -51.05 टक्के

सोलापूर -43.49 टक्के

ठाणे – 38.94 टक्के

वर्धा – 49.68 टक्के

वाशिम-43.67 टक्के

यवतमाळ – 48.81 टक्के

Nana Patole : ‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा, नाना पटोलेंचा हल्लाबोल

follow us