Download App

मोठी बातमी : चर्चित IRS अधिकारी समीर वानखेडे सुरू करणार राजकीय इनिंग; पक्ष अन् मतदारसंघही ठरला

15 वर्षांच्या कारकिर्दीत 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त करण्याची कारवाई वानखेडे यांच्या कार्यकाळात झाली आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राचे चर्चित IRS अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhde) त्यांची राजकीय इनिंग सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर, वानखेडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश करणार असून, आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, अशी महिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, लवकरच वानखेडे त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे. (IRS Sameer Wankhede May Be Join Eknath Shinde Shivsena Soon)

राज्याचा विकास जयंत पाटील योग्य करु शकतात; फडणवीसांच्या चॅलेंजनंतर पवारांचं सूचक विधान

तेव्हाच राजकीय प्रवास सुरू करता येणार

एकीकडे समीर वानखेडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यासाठी त्यांना राजकारणात येण्यापूर्वी आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. पदाचा राजीनामा दिल्यानंतर हा वानखेडे यांचा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागेल आणि त्यानंतरच वानखेडे त्यांचा नव्या राजकीय इनिंग प्रवास सुरू करू शकणार आहेत. त्यामुळे वानखेडे यांनी जर त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यास त्यावर गृहविभाग काय निर्णय देतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एका कार्डात मावणार नाहीत एवढी कामं; प्रगतीचा पाढा वाचत शिंदेंनी दिला ‘करेक्ट’ कार्यक्रमाचा इशारा

कोण आहेत समीर वानखेडे?

44 वर्षीय समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकारी आहेत. 2021 पर्यंत त्यांनी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर म्हणून काम केले आहे. एनसीबीमध्ये रुजू होण्यापूर्वी वानखेडे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केले आहे. 15 वर्षांच्या कारकिर्दीत 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त करण्याची कारवाई वानखेडे यांच्या कार्यकाळात झाली आहे. याशिवाय अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही समीर वानखेडे चर्चेचा विषय बनले होते.

आचारसंहितेत निर्णय जाहीर, शिंदे सरकारला भोवणार? आयोगाकडून कारवाईचे संकेत

यांच्यात होणार मुकाबला?

सध्या काँग्रेसच्या विद्यमान खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून त्यांच्या बहीणीला विधानसभेसाठी या मतदारसंघातून उमेदवार म्हणून रिंगणात उतरवयाचे आहे. त्यात आता वानखेडे हेदेखील याच मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे  बोलले जात आहे. असे झाल्यास विधानसभेत वर्षा गायकवाड यांची  बहीण आणि समीर वानखेडे यांच्यात थेट लढत होऊ शकते असा अंदाज आहे.

follow us