Subhedar: सुभेदार सिनेमा पाहिल्यावर समीर वानखेडे यांनी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, ‘खरे हिरो…’

Subhedar: सुभेदार सिनेमा पाहिल्यावर समीर वानखेडे यांनी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, ‘खरे हिरो…’

Sameer Wankhede: सध्या किंग खानच्या जवान सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच समीर वानखेडेंनी मराठी सिनेमा ‘सुभेदार’ (Subhedar Marathi Movie) पाहिला. श्री शिवराज अष्टक सिरियलमधील ‘सुभेदार’ हा पाचवा सिनेमा २५ ऑगस्ट दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या सिनेमानंतर दिग्पाल लांजेकरने ‘सुभेदार’ हा पाचवा सिनेमा प्रदर्शित केला आहे. (Digpal Lanjekar) हा सिनेमा सरकारी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी नुकताच बघितला आहे. त्यांनी हा सिनेमा बघितल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sameer Wankhede (@swankhede.irs)


समीर वानखेडे यांनी मॉलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते सिनेमा बघायला आल्याचं दिसत आहे. “एक महान योद्धा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असलेले ‘सुभेदार’ तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित एक सुंदर मराठी सिनेमा बघण्याची संधी मिळाली. त्यांचे नाव पराक्रम आणि शौर्याचे प्रतिक आहे. प्रत्येक भारतीयाने अनुकरण करावे, असे ते खरे वीर आहेत,” असं समीर वानखेडेंनी यावेळी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

३१ ऑगस्टला ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये ‘जवान’च्या एका सीनमध्ये किंग खान ‘मुलाला हात लावण्याअगोदर बापाशी बोल’ असं म्हणत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यानंतर हा डायलॉग समीर वानखेडेंसाठी असल्याचं नेटकरी म्हणत होते. एवढेच नाही तर समीर वानखेडे ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले होते. नंतर समीर यांनी एक पोस्टही शेअर केली होती.

Jawan: किंग खानच्या जवानमधील सुमित अरोराच्या संवादाने घातली प्रेक्षकांना भुरळ!

तसेच ‘सुभेदार’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला कमावला आहे. चाहत्यांनी सिनेमाला जोरदार प्रतिसाद दिला. यामध्ये चिन्मय मांडलकेर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारले असल्याचे बघायला मिळाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube