Download App

पाणी योजनांसाठी सोलरपंप ते निळवंडे कालव्यांच्या कामाला गती; आशुतोष काळेंचे मतदारसंघासाठी व्हिजन

आशुतोष काळे म्हणाले, पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने व सहकार्याने विकासाचे अनके प्रश्न सोडविले आहेत.

  • Written By: Last Updated:

Kopargaon Assembly Constituency: कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे (Kopargaon Assembly Constituency) महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट) उमेदवार आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale)यांनी कोपरगाव शहराच्या बेट भागातील जुनी गंगा येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन घेवून नारळ फोडला आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचा मेगाप्लान उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या पुढे मांडून मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन स्पष्ट करतांना कोपरगाव मतदार संघाच्या विकासाचे घोषणापत्र जाहीर केले.

जोरदार शक्तिप्रदर्शन करत आशुतोष काळेंचा उमेदवारी अर्ज; रॅलीत आवतरला जनसागर

यावेळी माजी आमदार अशोकराव काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, महानंदा दूध संघाचे माजी चेअरमन राजेश परजणे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, ज्येष्ठ नेते राजेंद्र जाधव, अॅड. रविकाका बोरावके, पद्माकांत कुदळे, विजयराव त्रिभुवन, मनसेचे शहराध्यक्ष सतिश काकडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवती अध्यक्षा वैशाली आभाळे, डॉ. अजय गर्जे, माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, फकीरमामु कुरेशी, प्रकाश दुशिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

कृष्णाई मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्याचे एकत्रिपणे प्रकाशन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रवादी घोषणापत्राचे अनावरण यावेळी झाले. यावेळी आशुतोष काळे म्हणाले, पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने व सहकार्याने विकासाचे अनके प्रश्न सोडविले आहेत. तर काही प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लागणार आहेत. यापुढील काळात गोदावरी खोऱ्याचे कमी झालेल्या पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात लवकरात लवकर कसे वळविले जाईल, यासाठी पाठपुरावा करणार आहे. गोदावरी कालव्यांची व पालखेड कालव्यांची दुरुस्ती तसेच निळवंडे कालव्यांच्या कामाला गती देवून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवायचे आहे. मतदार संघातील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांचे दरवाजे स्वयंचलीत करून या बंधाऱ्यांचे सेतूत रुपांतर करून दळणवळण अधिक जलद कसे होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.

सोनेवाडी-सावळीविहीर सीमेवर होणाऱ्या एमआयडीसीमध्ये जास्तीत जास्त उद्योग आणून कोपरगाव शहरातील 433 एकर जागेवर नवीन एमआयडीसी उभारून बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढायचा आहे. ग्रामीण भागातील ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवून सबस्टेशनच्या देखील क्षमता वाढवायच्या आहेत. मतदार संघातील सर्वत्र भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोलर पॉवर प्लांट उभारून शेतकऱ्यांसाठी व कोपरगाव शहरासह विविध गावातील पाणी योजनांसाठी सोलरपंप उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोपरगाव शहरातील के.बी.पी. विद्यालय व श्री सदगुरु गंगागीरीजी महाराज कॉलेजच्या परिसरात असलेल्या जागेवर भव्य क्रीडा संकुल उभारणार आहे. शहरात विविध ठिकाणी उद्यान विकसित करून भूमिगत गटारी व वीज वाहिन्या भूमिगत करून चांगल्या दर्जाच्या रस्त्यांच्या निर्मितींचे सुतोवाच करून आरोग्य व्यवस्थेबरोबरच शिक्षण व्यवस्था देखील बळकट करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा कार्य

पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा कार्यालयाचा अहवाल आमदार आशुतोष काळे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या कार्यावर आधारित असलेले नवीन गीत प्रदर्शित करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी या गीतावर चांगलाच ठेका धरला होता. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us