Assembly Election 2024 Devendra Eknath Shinde Ajit Pawar Reaction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत (Assembly Election 2024) भाजपची (BJP) आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. 288 जागांपैकी 220 जागांवर महायुती असल्याचं चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत महायुतीचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, ऐतिहासिक विजय झालेला आहे. विरोधकांना लोकांनी खोटं ठरवलं. त्यांनी आमची योजना चोरून त्यांच्या वचननाम्यात टाकलं, लोकांना हे कळलं. आम्ही दोन अडीच वर्षात जे काही केलं, ते आम्ही जनतेसमोर आणलं. लोकांना विकासकामं हवी आहेत. आम्हाला केंद्राचा मोठा सर्पोट मिळाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. आम्ही या राज्याला विकासाकडे घेवून जावू शकलो. कल्याणकारी योजना देवू शकलो. विश्वासावर गोष्टी चालतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! चिंचवडमध्ये शंकर जगताप विजयी, राहुल कलाटे यांचा पराभव
सर्वसामान्य घटकाच्या मागे उभं राहण्याचं काम केलंय. हे सरकार पाठिराखं सरकार आहे. आम्हाला देदीप्यमान विजय म्हणूनच मिळाला आहे, त्यांनी विजयाचं श्रेय जनता आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिलं आहे. जनतेच्या हितासाठी काम करण्याची आमची जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. वाचाळवीरांच्या बातम्या देवू नका, असं अजित पवार म्हणाले आहेत.
निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय…
अजून मतमोजणी सुरू आहे. त्यानंतर आमचे तिन्ही पक्षांचे नेते बैठक घेतील. आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत. विचारविनिमय करून निर्णय घेवू, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, आम्ही त्याच विश्वासाने काम करू असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही एकही बैठक घेतली नव्हती आणि हॉटेल देखील बुक केलं नव्हतं, असं अजित पवार म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असं वक्तव्य केलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत कोण? असा सवाल विचारला आहे. तर ईव्हीएमचा निर्णय मान्य आहे…मान्य आहे…मान्य आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.