डिंभे : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देवदत्त निकम यांना आंबेगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महायुतीकडून सहकारमंत्री दिपील वळसे पाटील (Dilip Walse Patil) निवडणुकीच्या रिंगणात आहे. याच निकमांवर वळसे पाटलांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.विरोधी उमेदवार केवळ सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने मते मागत आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता बहुमताने पुन्हा आपल्याला पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले आहे. ते ढाकणे (ता. जुन्नर) येथे आयोजित कोपरा सभेत बोलत होते.
आपल्याला आणखी प्रगती करायचीये; सोडवलेल्या प्रश्नांचा वळसे पाटलांनी वाचला पाढा
ते म्हणाले की, आपण वाडा ते घोडेगाव रस्त्यासाठी 1 कोटी 25 लाख रूपये, तळेकरवाडी नळ पाणीपुरवठा योजना, इंगलेवाडी पाझर तलावासाठी 15 लाख रूपये, साल गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटी 58 लाख रूपये मंजूर करून दिले आहेत. याशिवाय आपण सालोबा देवस्थानला राज्य शासनाचा तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा मिळवून दिलेला आहे.
…म्हणून वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली; आढळरावांनी सांगितली ‘अंदर की बात’
ढाकाळे गाव व परिसराने सर्वच निवडणुकांमध्ये पक्षाला, मला मनापासून साथ दिली. मी देखील प्रामाणिकपणे काम करून विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. अनेक विकासकामे आपण मार्गी लावली. पुढील काळात ढाकाळे येथील बैलगाडा शर्यतीचा घाट, तलावावरील शेड, शेवाळेवस्ती, साबळे वस्ती तांबडघाट या रस्त्यांची कामे आपण मार्गी लावणार आहोत, असे वळसे पाटील म्हणाले.
आंबेगावात वळसे पाटलांचाच गाजावाजा; सर्व्हेतून संपूर्ण चित्र स्पष्ट
वरील कामांशिवाय अन्य कामांसाठीदेखील आपण भरीव निधी मंजूर करून दिलेला आहे. या परिसरात ही विकासकामे करायची आहे. यासाठी पुन्हा प्रचंड मताधिक्याने सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे, माजी सभापती कैलासबुवा काळे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय काळे, राजाभाऊ काळे, ढाकाळे गावचे सरपंच धोंडीबा लांघी गुरुजी, खंडूशेठ काळे, शंकर डामसे, पंढरीनाथ काळे, प्रभाकर काळे, लक्ष्मण काळे, देवराम काळे, देवराम सुपे, ईश्वर डामसे, सखाराम वाजे, सागर काळे, संतोष जाधव, खंडू साबळे, निलेश लांघी, शांताराम वाजे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.