Download App

मोठी बातमी! ‘परिवर्तन महाशक्ती’ कडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, शिरोळ, मिरज स्वाभिमानीसाठी

Parivartan Mahashakti Candidates List : राज्यात विधानसभा निवडणुकाची घोषणा झाली असून सध्या अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. यातच भाजपकडून

  • Written By: Last Updated:

Parivartan Mahashakti Candidates List : राज्यात विधानसभा निवडणुकाची घोषणा झाली असून सध्या अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. यातच भाजपकडून (BJP) 20 ऑक्टोबर रोजी 100 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर येत्या काही दिवसात महाविकास आघाडीकडून (MVA) देखील उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे.

यावेळी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच परिवर्तन महाशक्तीने (Parivartan Mahashakti) देखील विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) (प्रमुख, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), बच्चू कडू (अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष) आणि राजू शेट्टी (संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत परिवर्तन महाशक्तीच्या 10 उमेदवारांची घोषणा केली आहे. या दहा उमेदवारांमध्ये बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्या नावाचा देखील समावेश आहे. त्यांना अचलपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

अनिल चौधरी यांना रावेरमधून संधी देण्यात आली आहे. तर गणेश निबाळकर यांना चांदवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच वामनराव चटप यांना राजुरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे तर अंकुश कदम यांना ऐरोली आणि सुभाष साबणे यांना देंगलुर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच गोविंदराव भवर यांना हिंगोली विधानसभा मतरदारसंघातून आणि माधव देवसरकर यांना हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर शिरोळ, मिरज या दोन मतदारसंघात स्वाभिमानी उमेदवार उद्या जाहीर करेल अशी माहिती राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिली.

माझ्या बापाविषयी बोलाल तर..,; थोरातांची वाघिण सुजय विखेंच्याही पुढचं बोलली

यावेळी बारामतीमध्ये देखील परिवर्तन महाशक्ती उमेदवार देणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात परिवर्तन महाशक्ती कोणता उमेदवार उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us