पवार कसलं परिवर्तन आणणार? खडा सवाल करत तिसऱ्या आघाडीने दंड थोपटले

  • Written By: Published:
पवार कसलं परिवर्तन आणणार? खडा सवाल करत तिसऱ्या आघाडीने दंड थोपटले

Pariwartan Mahashakti : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) अनुषंगाने राज्यात सर्वच पक्ष मैदानात उतरलेत. महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी थेट लढत पाहाययला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह तिसरी आघाडीदेखील मैदानात उतरली. परिवर्तन महाशक्तीची (Pariwartan Mahashakti) आज पुण्यात बैठक झाली. यावेळी बोलतांना आमदार बच्चू कडूंनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

Emergency Film : अभिनेत्री कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ला मिळालं सेन्सॉर प्रमाणपत्र; रिलीज डेट काय? 

पवार साहेब म्हणतात परिवर्तन आणू, ते कसले परिवर्तन आणतात, ते सत्तेत असतांना परिवर्तन आणू शकले नाहीत, परिवर्तन आम्ही आणू, असं कडू म्हणाले.

परिवर्तन महाशक्ती आघाडीची पुण्यात बैठक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
या परिषदेला प्रहारचे बच्चू कडू, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांची उपस्थित होते. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. कडू म्हणाले की, सामान्य माणसाला आपले वाटेल असे सरकार स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न असेल,आम्ही चांगले उमेदवार देणार आहोत. भाजप आणि कॉंग्रेस हे धार्मिक लढाई उभे करणारे पक्ष आहेत. मात्र, आम्हाला एका झेंडाच्या रंगाचे नाही तर तिरंगाचे सरकार आम्ही आणू. पवार साहेब म्हणतात परिवर्तन आणू, ते कसले परिवर्तन आणतात, ते सत्तेत असतांना परिवर्तन आणू शकले नाहीत, परिवर्तन आम्ही आणू, असं कडू म्हणाले.

सुनील टिंगरे यांचं तिकीट पक्क; अजितदादांनी स्वतः मला शब्द दिलायं 

पुढे बोलतांना बच्चू कडू म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडीलाही परिवर्तनाचा अधिकार नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला आहे. नवीन परिवर्तन हे खऱ्या कामाचे असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असेल, असंही कडू म्हणाले.

संभाजीराजे म्हणाले की, शाहू महाराज खासदार होण्यापूर्वीपासूनच स्वराज्य चळवळ सुरू आहे. लोकसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेस आणि स्वराज्य युती करणार होतं. कोल्हापूरची जागा स्वराज्याला देण्याचे आश्वासन काँग्रेस हायकमांडने मला दिले होते, असा छत्रपती संभाजीराजेंनी मोठा गौप्यस्फोट केला.

शाहू महाराजांसाठी मीही राबलो...
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी पुढे आल्यानंतर माझ्या समोरचे सर्व पर्याय थांबले. त्यामुळे शाहू महाराज उभे राहिले असतांना एक मुलगा म्हणून माझी जी जबाबदारी होती, ती मी पूर्णपणे पाडली. शाहू महाराज निवडून आले तेव्हा मला सत्कार समारंभाला का बोलावण्यात आले नाही? शाहू महाराजांना निवडून आणण्यात मी पण राबलो, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube