Ajit Pawar : महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप कोणत्याही क्षणी जाहीर (Maharashtra Elections) होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. महाविकास आघाडीत इनकमिंग वाढलं आहेत. त्याचा फटका महायुतीतील पक्षांना बसत आहे. आताही अजित पवारांना धक्का देणारी बातमी आली आहे. माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. या भेटीने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीत ही भेट झाल्याने बबन शिंदे काही वेगळा निर्णय होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अजितदादांना आणखी एक धक्का; अखेर राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी, पण पुतणीने टेन्शन वाढविलं
आमदार बबन शिंदे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट झाली. अजित पवार महायुतीत दाखल झाल्यानंतर राज्यातील राजकारण पूर्ण बदललं आहे. त्यात निवडणूकही जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. लवकरच याद्या जाहीर होतील अशी परिस्थिती आहे. यानंतर लढतीचं चित्र काही प्रमाणात स्पष्ट होईल.
मात्र या निवडणुकीआधी इच्छुकांकडून सेफ मतदारसंघाचा शोध घेतला जात आहे. यासाठीच पक्षांतराला वेग आला आहे. माढ्याचे आमदार बबन दादा शिंदे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी हवी आहे. यासाठीच त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीत संभाव्य उमेदवारीवर चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
माढा मतदारसंघात आमदार शिंदे यांचं चांगलं वर्चस्व आहे. या मतदारसंघात ते सलग सहा वेळेस निवडून आले आहेत. यावेळी मात्र आमदार शिंदे आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. कदाचित मुलाला तिकीट मिळवून देऊन निवडणुकीत उतरवले जाण्याचीही शक्यता आहे. जर तिकीट मिळालं नाही तर अपक्ष म्हणूनही निवडणूक लढण्याची तयारी आमदार शिंदे यांनी केल्याची माहिती आहे.
हिरामण खोसकर विरोधकांना निवडणुकीत धडा शिकवणार; अजित पवार त्र्यंबकेश्वरच्या सभेतून कडाडले
हडपसरमधील पाच नगरसेवक लवकरच अजितदादांची साथ सोडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी नगरसेवक आनंद अलकुंटे लवकरच पक्ष सोडू शकतात अशी चर्चा आहे. अजित पवार गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने अलकुंटे आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळाली आहे. या मतदारसंघात चेतन तुपे आमदार आहेत.