Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राज्यात 22 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. आज महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीच्या (Mahayuti) अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटल्याने उद्या संध्याकाळापर्यंत काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील इच्छुक उमेदवारांची भेटीगाठी सुरु केली आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील यांना एका युट्यूब चॅनेलच्या कमेंटमधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
जरांगे पाटील यांना युट्यूब चॅनलच्या कॉमेंटमध्ये अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर कॉमेंटचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. व्हायरल कॉमेंटचा स्क्रिन शॉटमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार अशी धमकी मनोज जरांगे पाटील यांनी देण्यात आली आहे.
बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाऊंटवरुन जरांगे पाटील यांना धमकी देण्यात आली आहे. व्हायरल स्क्रीन शॉर्टनंतर पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेमध्ये वाढत केली आहे. तसेच मनोज जरांगेंच्या भेटीसाठी येणाऱ्या इच्छुक उमेदवारांची तपासणी करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे चार ते पाच जणांनी प्रत्येक मतदारसंघात फॉम भरून ठेवा 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू आणि तेव्हा उमेदवार देखील जाहीर करू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मोठी बातमी! समीर भुजबळ यांचा मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा
विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत भाजपने 99, राष्ट्रवादी काँग्रेसने 38, शिवसेना (शिंदे गट) 45 आणि शिवसेना (ठाकरे गट) 65 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर काँग्रेस उद्यापर्यंत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.