Rohit Pawar News : अजितदादा मुख्यमंत्री झाले तर स्वत: फुलांचा गुच्छ घेऊन जाईल आणि दर्शन घेईल, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवार यांची फिरकी घेतलीयं. विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election) निकाल लागून तीन दिवस झाले तरीही अद्याप राज्याचा मुख्यमंत्री ठरत नाही. दिल्लीत भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना रोहित पवारांनी अजितदादांची फिरकी घेतलीयं.
ताहिर राज भसीनचा जागतिक हिट शो : ‘ये काली काली आंखें 2’ 10 देशांत गाजतोय
रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र एक विकसित राज्य असून राज्याचा मुख्यमंत्री आता दिल्लीतून ठरवला जात आहे. चार दिवस थांबाव लागंत आहेत, महायुतीच्या 222 जागा आल्या तरीही त्यांना निर्णय घेता येत नाही. एकनाथ शिंदे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं एकदाही नाव घेतलेलं नाही. मोदी आणि शाहांचं नाव शिंदेंनी घेतलं आहे. शिंदेंना कदाचित केंद्रात संधी देणार असून त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, मुख्यमंत्री फडणवीस बनतील की अजून कोणी याबाबत काही सांगता येत नसल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय.
कोण होणार CM? अमित शहा-तावडेंची खलबतं; आज दिल्लीत बैठक, धक्कातंत्राचीही भीती
तसेच अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर माझ्याकडून त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा असतील. महायुतीने जर अजित पवार यांना खरंच मुख्यमंत्री केलं तर माझे काका म्हणून मी स्वत: फुलांचा गुच्छ घेऊन त्यांना शुभेच्छा द्यायला जाईल, आणि त्यांचं दर्शन घेणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय.
दुचाकी चालकांसाठी नवा नियम! आता दोघांना हेल्मेट सक्ती, नियम मोडणाऱ्यावर होणार ‘ही’ कारवाई
महाविकास आघाडीत अनेक सिनियर नेते आहेत. ते वयाने आणि अनुभवाने मोठे आहेत. कदाचित मी आक्रमक असेलही, त्यामुळे आमचा जेव्हा गट केला जाईल त्याचा एक नेता होऊ शकतो. शरद पवार यांचे 43 आमदार गेले तेव्हा इतर पक्षाला सोबत घेऊन शरद पवार हे विरोधी पक्षनेते झाले होते आता कोण होईल हे पाहावं लागणार असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.