Chhagan Bhujbal On Manoj Jarange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन होणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळीपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा देखील भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतुत्वाकडून होऊ शकते.
तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांनाकडून ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये काही तरी घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शरद पवार (Sharad Pawar) , उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ईव्हीएम मशीन विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचे संकेत देखील दिले आहे. तर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील ईव्हीएम मशीन विरोधात पुरावे शोधण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
तर दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी बोलताना ईव्हीएमवरून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ईव्हीएम मशीनने जिंकलो असेल तर मला देखील एक लाख मत मिळायला हवी होती. माझं मताधिक्य वाढायला हवं होतं ते कमी झालं. असं माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, 2019 मध्ये माझं मताधिक्य 56 ते 57 हजारांवर गेलं होतं ते कमी होऊन 26 किंवा 27 हजारांवर आलं.
तर मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मतधिक्य कमी झाले. मनोज जरांगे पाटील साहेब आदल्या दिवशी सकाळी दहा पासून रात्री दोन पर्यंत गावोगावी फिरले आणि जातिवाद पसरवण्याच काम केलं म्हणून माझं मताधिक्य कमी झालं. असं माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले.
ज्याची काळजी होती ते घडलंच, रजनीकांतच्या मुलीचा संसार मोडला; कोर्टाचा निर्णय
ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केलं याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं त्यांनी काम केलं आणि झोकून काम केलं. मुख्यमंत्री होऊन देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क आहे आणि आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. असं देखील माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले.