गृह, महसूल अन् जलसंपदा.. वजनदार खाती भाजपालाच, सूत्र ठरलं, अजितदादांचं काय?

गृह, महसूल अन् जलसंपदा.. वजनदार खाती भाजपालाच, सूत्र ठरलं, अजितदादांचं काय?

Mahayuti New Cabinet Minister List Maharashtra Goverment : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल लागून पाच दिवस झाले, तरीही अजून महायुतीच्या (Mahayuti) मंत्रिमंडळ स्थापनेचं घोडं अजूनही अडलेलं आहे. महायुतीच्या सत्तावाटपामध्ये मुख्यमंत्रि‍पदासह इतर महत्वाची खाती भाजप (BJP0 स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती मिळतेय. सामान्य प्रशासन, गृह, महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंडळ ही महत्त्वाची खाती भाजपकडेच राहतील, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जातेय.

यामुळे मात्र अजित पवारांचं (Ajit Pawar) टेन्शन वाढल्याचं दिसतंय. महत्वाची खाती भाजपकडे गेली तर अजित पवार अन् एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे कोणती खाती असणार, हा मोठा प्रश्न आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन, सहकार, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, गृहनिर्माण, कृषी ही खाती मिळण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, राज्य उत्पादन शुल्क, पाणीपुरवठा ही खाते मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्या संख्या ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे असतो.

श्रीकांत शिंदे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री? शिंदेच्या प्रस्तावावर भाजपची काय भूमिका?

पाच आमदारांमागे एक मंत्रिपद असं सूत्र भाजपकडून निश्चित केलं जावू शकतं, तसं झाल्यास भाजपकडे 25, शिवसेनेकडे 10 तर अजित पवार यांना 8 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. खातेवाटपामध्ये नगरविकास खाते शिंदेंच्या शिवसेनेकडे, तर वित्त आणि नियोजन खाते अजित पवारांकडे जाऊ शकते. शिंदे आणि पवार या दोघांनी आज अमित शहा यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दिलीय. तर या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा निर्णय होईल, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

पराभवानंतर तनपुरे अन् वर्पे यांचा EVMवर संशय; निवडणूक आयोगाकडे पडताळणीची मागणी

मंत्रिमंडळात पुढील नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री), गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राहुल कुल, माधुरी मिसाळ यांची नावं भाजपकडून समोर आली आहेत.

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल आणि निलेश राणे यांच्या नावाचा समावेश आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत छगन भुजबळ, अदिती तटकरे, अजित पवार, धनंजय मुंडे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ आणि धर्मराव बाबा अत्राम यांच्या नावाचा समावेश आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube