श्रीकांत शिंदे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री? शिंदेच्या प्रस्तावावर भाजपची काय भूमिका?
Eknath Shinde Praposal Shrikant Shinde To ve Deputy Chief Minister : राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण असणार? नव्या सरकारचा शपथविधी (Mahayuti) केव्हा होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल 23 नोव्हेंबर रोजी झालाय झालाय. परंतु अजून महायुतीने मुख्यमंत्री (BJP) कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु अजून हा सस्पेन्स संपलेला नाही.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालंय. मजबूत संख्याबळ असताना देखील महायुती सरकार स्थापनेला उशीर होतोय का? हा प्रश्नसगळ्यांसमोर आहे. त्यात आता एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रिपदासाठी शर्यतीत नसल्याचं जाहीर केलंय. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य असेल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. भाजपकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जातोय. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी नवी भूमिका घेतल्याचं देखील समोर आलंय.
पराभवानंतर तनपुरे अन् वर्पे यांचा EVMवर संशय; निवडणूक आयोगाकडे पडताळणीची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना भाजपकडून केंद्रीत कॅबिनेट मंत्रिपद किंवा राज्यामध्ये उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी हे दोन्ही प्रस्ताव नाकारल्याचं समोर आलंय. जर मला मुख्यमंत्री बनवता येत नसेल तर सरकारचा नियंत्रक म्हणून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना जबाबदारी द्यावी. तर श्रीकांत शिंदे सध्या लोकसभेत खासदार आहे. त्यांना महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठांसमोर एकनाथ शिंदे यांनी ठेवला आहे.
आमदार म्हणतात बाहेर पडा, राऊत म्हणतात मविआत राहा; ठाकरे गटातही मिठाचा खडा!…
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ठेवलेल्या या प्रस्तावावर भाजप देखील सकारात्मक असल्याचं समोर आलंय. पडद्यामागे वेगात राजकीय घडामोडी घडत आहेत. परंतु मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी देखील लांबणीवर पडतोय. ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडली. सत्तास्थापनेचं घोडं कुठेही अडलेलं नसून मी मनमोकळा माणूस आहे. इतर सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हीच ओळख जास्त प्रिय असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा घेतलेला निर्णय मान्य असेल असं, देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.