BJP Exit Poll : माध्यमांचे एक्झिट पोल येताच भाजपही सरसावली; थेट ग्राऊंडवरून मागवला रिपोर्ट
Exit polls show BJP as largest party : राज्यात दोन महिन्यांपासून सुरु असलेला विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2024) धुरळा आज काहीसा शांत झालाय. राज्यातील 288 जागांसाठी काल मतदान पार पडलं. त्यानंतर आता 23 तारखेला येणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. त्यापूर्वी आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा एक्झिट पोल (Assembly Election 2024 Voting) समोर आलाय. राज्यात सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार? याबाबतचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
यासंदर्भात विधानसभेचे मतदान झाल्यानंतर भाजपने (BJP) अंतर्गत सर्व्हे जाहीर केलाय. महायुतीची सत्ता येणार असा दावा भाजपच्या बूथ लेवल्ह सर्व्हेने केला आहे. भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर आलाय. महायुतीला (Mahayuti0 164 जागा, महाविकास आघाडीला 100 तर इतर पक्षांना 24 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. महायुतीमध्ये 100 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज या सर्व्हेने वर्तवला आहे.
महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे? ‘या’ हाय व्होल्टेज लढती ठरणार महत्वाच्या, वाचा सविस्तर
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत झाली. मात्र, महायुतीचं पारडं काहीसं जड असल्याचं बोललं जातंय. तर एक्झिट पोलनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला सरासरी 100 जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. सर्वच एक्झिट पोलनुसार भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला सरासरी 78 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
राज्यात सर्वात जास्त मतदान अन् सर्वात कमी मतदान कुठे झालं? एका क्लिकवर वाचा
विधानसभा निवडणुकीत ‘शरद पवार विरूद्ध अजित पवार’ अशा लढतींमध्ये शरद पवार गटाची सरशी झाल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. तर लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील काकांची सरशी होताना दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आघाडीवर आहे. तर या सहाही पक्षांमध्ये अजित पवार यांचा पक्ष सहाव्या स्थानी असल्याचं, एक्झिट पोलच्या सर्व्हेमधून समोर आलंय.
आता राज्यात नेमकं कोण सरकार स्थापन करतंय? हे चित्र तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. अनेकदा हरियाणासह अनेक निवडणुकींमध्ये एक्झिट पोलचे अंदाज फसवे ठरलेले आहेत. त्यामुळे हे फायनल आकडे नाहीत, यामध्ये बदल देखील होवू शकतो. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर होणार आहेत.