विनोद तावडेंच्या डायरीत 15 कोटी; क्षितिज ठाकूर यांचा गंभीर आरोप; विरोधक आक्रमक
Kshitij Thakur Allegations 15 Crores In Vinod Tawde Diary : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बहुजन विकास आघाडीकडून भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी विरारमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलाय. विरार पूर्वेला असणाऱ्या मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी देखील हॉटेलमध्ये आले (Assembly Election 2024) होते. त्यांच्यामध्ये बैठक सुरु असतानाच बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते देखील हॉटेलमध्ये आले होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप केला.
यादरम्यान विवांत हॉटेलमध्ये विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर (Kshitij Thakur) उपस्थित होते. यावेळी विनोद तावडे अन् क्षितिज ठाकूर यांच्यात बाचाबाची झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. तसेच विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन आले होते. विनोद तावडे यांच्यासोबत काही डायऱ्या देखील होत्या, असा दावा देखील क्षितिज ठाकूर यांनी केलाय. क्षितिज ठाकूर यांनी, विनोद तावडे यांच्याकडे डायऱ्या सापडल्या. त्यामध्ये 15 कोटींची नोंद असल्याचा आरोप केलाय. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चांगलाच गोंधळ उडालाय.
अर्रर्र! इंस्टाग्राम ॲप डाउन? सर्व्हर, लॉगिनच्या समस्या… नेटिझन्सने X वर पोस्ट करत तक्रारी नोंदवल्या
विरोधक आक्रमक
या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाल्याचं दिसतंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ‘भाजपचा खेळ खल्लास’ असं वक्तव्य केलंय. जे काम निवडणूक आयोगाने करायला पाहिजे होते, ते काम ठाकूर यांनी केलंय. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो अन् इकडे शेपूट घालतो, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांची गाडी तपासली. ठाकूर यांचे कार्यकर्ते तावडेंची गाडी तपासण्यासाठी मागत आहेत.
Video : भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटतोय; बहुजन विकास आघाडीचा थेट आरोप, नालासोपारात तुफान राडा
हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?
विनोद तावडे 5 कोटी रूपये घेऊन आले होते. त्यांच्याकडे दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. या डायऱ्यांमध्ये पैशांचं वाटप कसं केलं? याबाबत माहिती आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याबद्दल आम्ही तक्रार केलीय. पुढे या तक्रारीचं काय होणार आहे, हे माहित आहे. सरकार यांचं आहे, अशी टीका हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. तेव्हापासून विनोद तावडे मला सारखे फोन करत आहे. माझी चूक झाली, मला सोडवा अशी विनंती करत आहेत. आतापर्यंत तावडे यांनी 25 फोन केल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केलाय.