Assembly Election 2024: कोथरुडमध्ये चंद्रकांतदादांची मोठी कोंडी; भाजपच्या बालवडकरांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला !
Assembly Election 2024 : राज्यात विधानसभेसाठी (Assembly Election 2024) महायुती व महाविकास आघाडीकडून जोरात तयारी सुरू आहे. परंतु इच्छुकांचे संख्या जास्त आहे. त्यात युती आणि आघाड्यांमध्ये जागा वाटप कशी होणार असा मोठा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर आहेत. त्यात पक्षाविरोधात अनेक ठिकाणी बंडखोरी होऊ शकते. पुण्यातील कोथरुड मतदारसंघात आता त्याचे चिन्ह दिसू लागले आहे. मंत्री व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरोधात आता भाजपचे माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. कोथरुड मतदारसंघावर त्यांनी दावा ठोकला आहे.
संजय गायकवाडांसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल, तलवारीने केक कापणं आलं अंगलट!
नगरसेवक असताना त्यांनी या भागात अनेक कामे केलेली असून, त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. सध्या ते अमोल बालवकर फाउंडेशनच्या माध्यमातून जनसंपर्कात आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून ते मोठ-मोठ मोठे कार्यक्रम घेत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते शक्तिप्रदर्शन करत आहेत. भाजप पक्ष हा मेरीटच्या आधारावर उमेदवार निवडण्यात येईल. मी भाजपमधून इच्छुक असून भाजप माझा नक्की विचार करेल. प& श्रेष्ठी मलाच विधानसभेसाठी उमेदवारी देईल असा विश्वास अमोल बालवडकर व्यक्त करत आहेत. उमेदवाराचा विचार न केल्यास वेगळा निर्णय घेऊ असा इशाराही बालवडकर हे देत आहे. त्यामुळे यंदा विधानसभा लढायची असाच चंग बालवडकर यांचा दिसत आहे. त्यामुळे कोथरुड मतदारसंघासाठी भाजपमध्ये चुरस असल्याचे दिसून येत आहे. हा जागेवरून कलह निर्माण होऊ शकतो.
Rakesh Pal : मोठी बातमी! भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन
मंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदारसंघाचे आमदार आहे. ते कोल्हापूरचे आहे. गेल्या विधानसभेला त्यांना थेट कोथरुडमधून पक्षाने उमेदवारी दिली होती. ते मोठ्या मताने निवडून आले होते. यंदा मात्र त्यांना विरोध सुरू झाला आहे. बालवडकर हे या मतदारसंघातून जोरदार तयारी करत आहेत.
मोठ-मोठे कार्यक्रम
अमोल बालवडकर यांच्याकडून फाउंडेशनच्या माध्यमातून मोठमोठ कार्यक्रम घेतले जात आहे. कोथरुड येथील कर्वेनगर भागात दोन दिवसांपूर्वी
खेळ रंगला पैठणीचा महिलांचा मेळावा येथे आयोजित करण्यात आला होता. यासोबतच महिलांसाठी मनोरंजन म्हणून मंगळागौर आणि लकी ड्रॉ चे देखील आयोजन करण्यात आला होता. या मेळाव्यास जवळपास अडीच हजार पेक्षा जास्त महिलांनी सहभाग दर्शविला. तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमोल बालवडकर फाऊंडेशन व ॲटेनेक्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमानाने कोथरुड मतदार संघातील नागरीकांकरीता “Amol Balwadkar, Independence Day Run 2.0” चे आयोजन करण्यात आले होते.