संजय गायकवाडांसह तिघांविरूध्द गुन्हा दाखल, तलवारीने केक कापणं आलं अंगलट!
Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांना स्टंट करणं चांगलच अंगाशी आलं. मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापून तलवारीनेच आपल्या सहकाऱ्यांना केक भरवल्याने गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली. बुलढाणा शहर पोलिसात (Buldhana City Police) गायकवाड यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rakesh Pal : मोठी बातमी! भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन
मुंबई पोलीस अधिनियम 135 अन्वये कलम 37(1)(3) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. आ. संजय गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी हजारो नागरिकांसमोर तलवारीने केक कापून आपले चिरंजीव मृत्युंजय गायकवाड याचा वाढदिवस साजरा केला होता. एवढंच नाही तर त्यांनी पत्नी पूजा संजय गायकवाड यांनी इतर लोकांना चक्क तलवारीने केक भरून त्यांचे तोंड गोड केले. या सर्व कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकारामुळं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती.
‘लय बेस्ट, वाघ मागत नसतो अन् …’, जरांगेंचा संभाजी भिडेंना प्रत्युत्तर
दरम्यान, सामान्य माणसाने तलवारीने केक कापला तर त्या व्यक्तीवर शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जातो. पण, आता शिंदेंच्या आमदाराने तलवारीनं केक कापल्याने सुजाण नागरिक आणि विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलीस काय कारवाई करते, असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर पोलिसांनी सुमोटो घेत आमदारांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे प्रदर्शन केल्याचा गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी विरोधकांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. त्यामुळे संजय गायकवाड यांनी या प्रकरणावर भाष्य करत आपल्या कृत्याची स्पष्टोक्ती दिली. तलवारीने केक कापणे हा गुन्हा होऊ शकत नाही. तलवारीने केक कापण्याचा उद्देश कुणालाही इजा पोहोजवण्याचा नाही. त्यामुळे यावर गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले. नेत्यांना तलवारी देणं म्हणजे मर्दांगीचे प्रतीक आहे. पोलिस परेडवेळी सुद्धा पोलीस तलवार दाखवतो, मग तो काय लोकांना धमकावतो का? आमच्या पूर्वजांपासून आम्ही तलवार चालवतो, त्यामुळं आम्ही तलवार वापरणार. चुकीचा वापर केला असल तर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला.