‘पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते…हे दुर्देव’; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

‘पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते…हे दुर्देव’; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

Chandrakant Patil On Pankja Munde : पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते, हे दुर्देव, असं विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केलं आहे. दरम्यान, नूकतंच राष्ट्रीय समाज पक्षाचे पक्षाचे महादेव जानकरांनी आमचे 145 आमदार निवडून आले तर पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना मुख्यमंत्री करणार असल्याचं विधान केलं. जानकरांच्या विधानामुळे भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. अशातच पंकजा मुंडेंची पक्षात घुसमट होत असल्याचंही बोललं जात होतं. या संपूर्ण घडामोडींवर चंद्रकांत पाटलांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं आहे. त्यांनी अमरावतीतून माध्यमांशी संवाद साधला आहे.

Ind Vs Aus : रोमहर्षक सामन्यात कांगारुंना नमवलं; भारताचा 2 गडी राखून विजय

चंद्रकांत पाटील म्हणाले, महादेव जानकर यांना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपशी जोडलं आहे. जानकर मुंडे कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यामुळे अशा प्रकारची प्रतिक्रिया देणे हे चुकीच नाही. लोकशाहीमध्ये तेवढा आकडा जुडला की करता येतं. पंकजा मुंडेंच दुर्दैव आहे की, त्या शिंकल्या तरी बातमी होते. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

नूकताच पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे यांना जवळचा चष्मा लागला असल्याचं म्हणाल्या आहेत. आपल्या ताईंना चष्मा लागला… असं गाणं म्हणत पंकजा मुंडेंनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता जवळचं सगळं स्पष्ट दिसेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत, पण हे नेमकं कोणाला उद्देशून म्हणाल्या आहेत. हे स्पष्ट झालं नाही. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं.

वर्ल्डकपदरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना भगवी जर्सी घालण्याचा प्रयत्न; ममतांचा भाजपवर गंभीर आरोप

काय म्हणाले होते जानकर?

राष्ट्रीय समाज पक्षाचे 145 आमदार निवडून आले तर मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेन, असे जानकर म्हणाले. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानला आहे. या नात्याने पंकजा या माझ्या बहिण आहेत. आमच्या पक्षाचे जर 145 आमदार निवडून आले तर मी माझ्या बहिणीलाच मुख्यमंत्री करेन अशी घोषणा महादेव जानकरांनी केली.

आम्ही ज्यावेळी भाजपाचे मित्र पक्ष होतो, त्यावेळी तुमचा पक्ष भाजपात विलीन करा असे सांगितले होते. परंतु, आम्ही तसे केले नाही. आम्ही होतो म्हणून भाजपाचं सरकार आलं. पश्चिम महाराष्ट्रात तर भाजपला कुणीही ओळखत नाही, अशी टीकाही जानकरांनी भाजपवर केली.

दरम्यान, महादेव जानकर हे एकेकाळी भाजपाचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर आता सरळसरळ भाजपाची कोंडी करू लागले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचे भाजपशी खटके उडू लागल्याने त्यांनी आता थेट पंगा घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा वक्तव्य करून भाजपाच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आता भविष्यात पंकजा मुंडे भाजपमध्येच असतील की जानकरांसोबत? असा संभ्रम जानकरांनी निर्माण केला आहे. मात्र, यावर अद्याप पंकजा मुंडे यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube