वर्ल्डकपदरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना भगवी जर्सी घालण्याचा प्रयत्न; ममतांचा भाजपवर गंभीर आरोप

वर्ल्डकपदरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना भगवी जर्सी घालण्याचा प्रयत्न; ममतांचा भाजपवर गंभीर आरोप

Mamata Banerjee On Team India World Cup Jersey : वर्ल्डकपमध्ये (world cup 2023)भारतीय संघाचा पराभव झाला. त्यावरुन देशभरात राजकारण सुरु झालं आहे. भाजपवर (BJP)विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. वर्ल्डकप मॅचदरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना भगवी जर्सी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यावरुन राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

विवाहबाह्य संबंध आता गुन्हा ठरणार? हिवाळी अधिवेशनात क्रांतीकारी निर्णय होण्याची शक्यता

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भारतीय क्रिकेटपटूंनी भगवी जर्सी घालण्याला विरोध केला, त्यामुळे त्यांना सामन्यादरम्यान भगवी जर्सी घालावी लागली नाही. भगवा हा त्यागाचा रंग आहे पण आपण तर भोगी आहात असं म्हणत ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

SC च्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवींचे निधन, वयाच्या ९६ वर्षी घेतला अखेरचा श्वास

ममता बॅनर्जी यांनी भारतीय संघाच्या सरावादरम्यान भगव्या रंगातील जर्सीबद्दलही आक्षेप घेत प्रश्न उपस्थित केला होता. सर्व काही भगव्या रंगामध्ये रंगवलं जातंय, असं म्हणत ममता बॅनर्जींनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

त्या म्हणाल्या होत्या की क्रिकेटपटूंना भगव्या रंगाच्या जर्सी का घातल्या होत्या? हे समजण्यापलीकडचे आहे. भाजपवाले प्रत्येक गोष्टीमध्ये भगवीकरण करणयाचा प्रयत्न सुरु असल्याचाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

विरोधकांकडून पंतप्रधान मोदी स्टेडियममध्ये उपस्थित असल्यामुळेच भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भारतीय संघाच्या पराभवाचं खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच फोडलं आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, वर्ल्डकपचा फायनल सामना हा कोलकाता किंवा मुंबईमध्ये असता तर भारतीय संघ विजयी झाला असता. त्याचबरोबर बॅनर्जी म्हणाल्या की, पापी लोकांच्या अनुपस्थितीमधील सर्व सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार निशाणा साधला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube