विवाहबाह्य संबंध आता गुन्हा ठरणार? हिवाळी अधिवेशनात क्रांतीकारी निर्णय होण्याची शक्यता

विवाहबाह्य संबंध आता गुन्हा ठरणार? हिवाळी अधिवेशनात क्रांतीकारी निर्णय होण्याची शक्यता

Extramarital affair अर्थात विवाहबाह्य संबंध भारतात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. याला कारण ठरले आहे ते अलीकडेच एका संसदीय समितीने केंद्र सरकारला केलेली एक शिफारस.

मोदी सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या IPC विधेयकातील बदलांबाबत सूचना करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. याच समितीने आता ‘विवाहित पुरुष किंवा स्त्रीने इतर कोणाशी शारीरिक संबंध ठेवले तर ते गुन्ह्याच्या कक्षेत आले पाहिजेत, कारण विवाह ही अत्यंत पवित्र परंपरा आहे आणि ती जतन करण्याची गरज आहे, असे निरीक्षण नोंदविले आहे. (Extramarital relationship will now be a crime in India, Modi government is preparing to take a big decision.)

याच समितीच्या सूचनेनंतर केंद्र सरकार पुन्हा एकदा विवाहबाह्य संबंधांना गुन्ह्याच्या श्रेणीत समाविष्ट करण्याचा विचार करत असून येत्या काळात यासंबंधीचे विधेयकही आणले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. मात्र अशा सूचना कशाच्या आधारे दिल्या जात आहेत आणि त्यावर विचार करण्याचा सरकारचा निर्णय कितपत योग्य असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आधी विवाहबाह्य संबंध म्हणजे काय ते जाणून घेऊ

हा शब्द अशा लोकांसाठी वापरला जातो जे विवाहित आहेत परंतु दुसऱ्या जोडीदारासोबत शारिरीक नातेसंबंधात राहतात.पण तज्ज्ञांच्या मते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे केवळ शारीरिक संबंध नसतात. कोणतीही व्यक्ती विवाहित असेल आणि त्याच्या जोडीदाराशिवाय इतर कोणाशीही व्यक्तीचशी त्याचे भावनिक संबंध असले तरी ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणून गणले जाते.

भारतात विवाहबाह्य संबंधांसंदर्भात सध्याची तरतूद काय आहे?

2018 पूर्वी, भारतातही व्यभिचार किंवा विवाहबाह्य संबंध हा गुन्हा मानला जात होता. आयपीसीच्या कलम 497 अन्वये विवाहित असताना दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यास 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद होती. मात्र, या कायद्याची विशेष बाब म्हणजे याअंतर्गत कोणत्याही महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. आयपीसीच्या कलम 497 अन्वये पती पत्नीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करत होता, परंतु तो पत्नीविरुद्ध कोणतीही कारवाई करू शकत नाही.

हा कायदा केव्हा आणि का रद्द करण्यात आला?

2018 मध्ये, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हे कलम असंवैधानिक घोषित केले. सोबतच ते काढून टाकण्याचा निर्णय दिला. तेव्हापासून भारतात व्यभिचार म्हणजेच विवाहित महिलेशी संबंध ठेवणे हा गुन्हा नाही.

2018 मध्येच तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी व्यभिचार कायद्याला घटनाबाह्य ठरवले होते आणि म्हटले होते की, “व्यभिचाराला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवता येणार नाही आणि तो गुन्हाही असू नये.” जोसेफ शायनीच्या जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला.

SC च्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवींचे निधन, वयाच्या ९६ वर्षी घेतला अखेरचा श्वास

आयपीसीच्या कलम 497 ला घटनाबाह्य घोषित करताना, न्यायमूर्ती मिश्रा यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले आहे की, “आता लग्नात पती पत्नीचा मालक नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे. स्त्री किंवा पुरुष दोघांचे कायदेशीर सार्वभौमत्व हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजही व्यभिचार हा घटस्फोटासाठी एक मजबूत आधार आहे, परंतु तो फौजदारी गुन्हा नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

समितीची नवीन सूचना कितपत योग्य आहे?

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील विराग गुप्ता म्हणतात, ‘भारतातील हे फौजदारी कायदे ब्रिटिश काळातील वसाहतवादी कायदे आहेत. ते सोपे, भारतीय लोकशाहीनुसार बनवण्याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा होत आहे. त्याच संदर्भात तीन कायद्यांमध्ये बदल झाल्याची चर्चा असून संसदीय समितीने दिलेल्या सूचना सध्या केवळ सूचना आहेत. आता भविष्यात त्यांना मान्यता मिळेल आणि त्यानंतरच या कायद्यांमध्ये कसे बदल करायचे याचा निर्णय घेतला जाईल.

समितीच्या सूचनेची अंमलबजावणी करण्याचा किती योग्य निर्णय आहे.

वकील अविनाश मिश्रा म्हणाले, समितीच्या सूचनेवर केंद्राने विचार करणे कितपत योग्य आहे हे सांगता येणार नाही, परंतु 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंध गुन्हा न ठरविण्याचा निर्णय देताना कलम 497 तटस्थ नाही असे म्हंटले होते. पण आता नवीन प्रस्तावित कायदे स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होतील, त्यामुळे त्या दृष्टीने ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सुसंगत आहे.

सचिनची लेक अन् रश्मिका ‘डीपफेक’च्या जाळ्यात; मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय

अ‍ॅरेंज्ड मॅरेज हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचे कारण बनत आहे का?

बीबीसीच्या एका अहवालात 2018 च्या सर्वेक्षणाचा हवाला देत असे म्हटले आहे की, या सर्वेक्षणानुसार, 1 लाख 60 हजाराहून अधिक भारतीय कुटुंबांतील 93 टक्के लोकांनी त्यांचे लग्न अरेंज्ड मॅरेज असल्याचे म्हटले आहे. लग्न म्हणजे प्रेमविवाह असल्याचे सांगणारे केवळ तीन टक्के लोक होते. तर केवळ दोन टक्के लोकांनी त्यांच्या लग्नाचे वर्णन लव्ह कम अरेंज मॅरेज असे केले आहे. यावरून हे स्पष्ट होते की भारतातील बहुतेक लोक स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर कुटुंबाच्या इच्छेनुसार लग्न करत आहेत.

कंटाळ्यामुळेही बहुतेक नाती बिघडत आहेत, असे अनेक तज्ञ सांगतात. बहुतेक स्त्रिया कंटाळवाणेपणा आणि नीरसपणामुळे दुसऱ्याशी बोलू लागतात. महिलांना त्यांच्या पतीकडून भावनिक जवळीक हवी असते. तर पुरुषांना मुख्यतः शारीरिक जवळीक हवी असते. अशा नात्यात अनेकवेळा असे घडते की पती-पत्नी एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत किंवा त्यांचे प्रेम, आपुलकी किंवा कौतुक व्यक्त करू शकत नाहीत.

कोणत्या देशात व्यभिचार हा गुन्हा नाही?

भारताच्या शेजारील देश चीनमध्ये व्यभिचार हा गुन्हा नाही, परंतु घटस्फोटाचे कारण म्हणून ते नमूद केले जाऊ शकते. म्हणजेच लग्नानंतर महिलेचे दुस-या पुरुषाशी संबंध असतील तर पती या आधारावर घटस्फोट घेऊ शकतो. चीनशिवाय दक्षिण कोरियानेही काही वर्षांपूर्वी व्यभिचाराला गुन्हेगार ठरवले होते. यापूर्वी यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद होती. ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक युरोपीय देशांमध्ये विवाहाबाहेर प्रेमसंबंध असणे बेकायदेशीर नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube