World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा ‘चॅम्पियन’सारखा विजय; भारताची फलंदाजी, गोलंदाजी अखेरच्या सामन्यात ढेपाळली

IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी का घेतली ? टीम इंडियाच्या धोक्याचं कारण कमिन्सने सांगितलं

जवळपास दीड महिन्यांपासून सुरु झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा (Cricket World Cup 2023) अंतिम सामना (World Cup Final) आज (19 नोव्हेंबर) दुपारी दोनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांसह संपूर्ण जगातील चाहते या सामन्यांकडे डोळे लावून बसले आहेत. विशेष म्हणजे या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उप-पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स उपस्थित राहणार आहेत. (ICC Cricket World Cup 2023 final match India vs Australia live update live cricket score)

The liveblog has ended.

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Nov 2023 08:58 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 195/3

    36 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा आहे. ट्रॅव्हिस हेड 102 चेंडूत 109 धावांवर खेळत आहे. तर मार्नस लॅबुशेन 87 चेंडूत 42 धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये 148 धावांची भागीदारी आहे. ऑस्ट्रेलियाला आता विजयासाठी 84 चेंडूत फक्त 46 धावा करायच्या आहेत.

  • 19 Nov 2023 08:20 PM (IST)

    हेड आणि लॅबुशेन यांच्यातील शतकी भागीदारी

    ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांच्यात 121 चेंडूत 101 धावांची भागीदारी आहे. 27 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा आहे.

  • 19 Nov 2023 07:18 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाचा स्कोर 51-3

    9 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा आहे. शमी आणि बुमराहसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज हतबल दिसत आहेत. जसप्रीत बुमराहने स्टीव्ह स्मिथला बाद करून ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला.

  • 19 Nov 2023 06:35 PM (IST)

    मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलियाला पहिला झटका, वॉर्नर आऊट

    ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट दुसऱ्या षटकात 16 धावांवर पडली. मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला स्लिपमध्ये झेलबाद केले. वॉर्नरला तीन चेंडूत केवळ सात धावा करता आल्या.

    जसप्रीत बुमराहने पहिले षटक टाकले. या षटकात तीन चौकारांसह एकूण 15 धावा काढल्या. हेडने दोन चौकार मारले तर वॉर्नरने एक चौकार मारला.

  • 19 Nov 2023 05:58 PM (IST)

    ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य

    IND vs AUS Final: विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय संघासाठी आतापर्यंत खूपच वाईट राहिला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 240 धावांवर केल्या आहेत. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 धावा केल्या. विराट कोहलीने 54 आणि रोहित शर्माने 47 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रोलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान दिले आहे.

  • 19 Nov 2023 05:37 PM (IST)

    भारताची आठवी विकेट पडली

    टीम इंडियाने 45 व्या षटकात 214 धावांवर आठवी विकेट गमावली आहे. अॅडम झाम्पाने जसप्रीत बुमराहला एलबीडब्ल्यू आऊट करून भारताला आठवा धक्का दिला.

    भारताची सातवी विकेट मोहम्मद शमीच्या रुपात पडली
    भारताने 44 व्या षटकात 211 धावांवर सातवा विकेट गमावला आहे. मोहम्मद शमी 10 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने सहा धावा करून बाद झाला. 44 षटकांनंतर भारताची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात 213 धावा आहे. आता सूर्यकुमार यादव ही शेवटची आशा आहे.

  • 19 Nov 2023 05:17 PM (IST)

    भारताची सहावी विकेट पडली

    भारताने 42 व्या षटकात 203 धावांवर सहावी विकेट गमावली आहे. केएल राहुल 107 चेंडूत 66 धावा करून बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने विकेटच्या मागे झेलबाद केले. 42 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 6 विकेटवर 207 धावा आहे.

  • 19 Nov 2023 04:50 PM (IST)

    भारताची पाचवी विकेट पडली, रवींद्र जडेजा बाद

    केवळ 178 धावांवर भारतीय संघाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. जोश हेझलवूडने 36व्या षटकात भारताला पाचवा धक्का दिला. त्याने रवींद्र जडेजाला विकेटच्या मागे झेलबाद केले. 22 चेंडूत 9 धावा करून जडेजा बाद झाला. आता केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत.

  • 19 Nov 2023 04:12 PM (IST)

    नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सन्नाटा, विराट कोहली आऊट

    टीम इंडियाला 29व्या षटकात 148 धावांवर मोठा धक्का बसला. विराट कोहली 63 चेंडूत 54 धावा करून बाद झाला. विराटला पॅट कमिन्सने बोल्ड केले. आता भारताची टीम अडचणीत आली आहे. रविंद्र जडेजा मैदाना आला आहे. केएल राहुलने 71 चेंडूत 39 धावा केल्या आहेत.

  • 19 Nov 2023 04:01 PM (IST)

    विराट कोहलीने अर्धशतक झळकावले

    सेमीफायनल आणि फायनलमध्ये 50 हून अधिक धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. अंतिम सामन्यात किंग कोहलीने 56 चेंडूत अर्धशतक झळकावले. यापूर्वी त्याने उपांत्य फेरीत शतक झळकावले होते. कोहलीने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष केला.

    27.5 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन विकेटवर 144 धावा आहे. केएल राहुल 66 चेंडूत 36 तर विराट कोहली 60 चेंडूत 52 धावांवर खेळत आहे.

  • 19 Nov 2023 03:28 PM (IST)

    टीम इंडियाचा स्कोर 100 पार

    विराट कोहली मोठ्या आत्मविश्वासाने फलंदाजी करत आहे. केएल राहुल त्याला चांगली साथ देत आहे. 19 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 113 धावा आहे. कोहली 38 आणि राहुल 18 धावांवर खेळत आहे.

  • 19 Nov 2023 03:23 PM (IST)

    रोहित शर्माचा नवा विक्रम केला

    रोहित शर्मा आता कर्णधार म्हणून विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.रोहित शर्माने अंतिम सामन्यात 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाला, पण त्याने एक शानदार विश्वविक्रम रचला. रोहित आता कोणत्याही एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने या विश्वचषकातील 11 सामन्यांमध्ये एकूण 597 धावा केल्या आहेत, जो विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.

  • 19 Nov 2023 02:55 PM (IST)

    रोहित शर्मानंतर अय्यर आऊट

    हिटमॅन रोहित शर्मानंतर मैदानात आलेला श्रेयस अय्यर 4 धावा करुन बाद झाला. अय्यरला पॅट कमिन्सने विकेटच्या मागे झेलबाद केले. त्याला तीन चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. भारताचे तीन महत्त्वाचे फलंदाज 11व्या षटकात 81 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

    भारताची दुसरी विकेट रोहित शर्माच्या रूपाने पडली. 31 चेंडूत 47 धावा करून तो बाद झाला. रोहितने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. ग्लेन मॅक्सवेलने त्याला बाद केलं.

  • 19 Nov 2023 02:47 PM (IST)

    हिटमॅन रोहित शर्मा आऊट

    भारताने 10 षटकांनंतर 2 गडी गमावून 80 धावा केल्या. विराट कोहली 23 खेळत आहे. रोहित शर्मा 47 धावा करुन बाद झाला आहे. श्रेयस अय्यर 4 धावांवर खेळत आहे.

  • 19 Nov 2023 02:36 PM (IST)

    रोहित शर्माची फटकेबाजी, शुभमन गिल बाद

    कर्णधार रोहित शर्माने धुव्वाधार सुरूवात केली आहे. रोहितने तीन चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. तर शुभमन गिल चार धावांवर बाद झाला. त्याला मिचेल स्टॉर्कने केले बाद. विराट कोहली मैदानात

  • 19 Nov 2023 02:04 PM (IST)

    World Cup 2023 : फायनल मॅचपूर्वी विराट कोहलीला सचिन तेंडुलकरकडून मिळाले खास गिफ्ट

    आजच्या फायनल मॅचपूर्वी विराट कोहलीला दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने खास गिफ्ट दिले आहे. गत मॅचमध्ये विराटने सचिनचे 49 शतकांचे रेकॉर्ड मोडले होते. त्यानंतर आज सचिनने विराटला त्याची वर्ल्डकप जर्सी आणि विराटचे अभिनंदन करतानाचे फोटो भेट दिले.

  • 19 Nov 2023 01:41 PM (IST)

    भारताच्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल नाही

    भारताच्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. कर्णधार रोहित शर्माने गत काही सामन्यांमधील प्लेईंग 11 न बदलण्याचे धोरण कायम ठेवले आहे.

  • 19 Nov 2023 01:34 PM (IST)

    World Cup Final 2023 : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय

    World Cup Final 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. योगायोग म्हणजे

  • 19 Nov 2023 01:22 PM (IST)

    World Cup Final 2023 : भारतीय टीम नरेंद्र मोदी स्टेडियमवर दाखल

    भारतीय टीम नरेंद्र मोदी स्टेडियमवर दाखल झाली आहे.

  • 19 Nov 2023 01:18 PM (IST)

    World Cup Final 2023 : प्लेईंग-11 कशी असेल?

    खेळाडूंच्या निवडीबाबत पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला की, गेल्या अडीच वर्षांपासून संघात कोण फिट बसेल यासाठी खेळाडूंना टेस्ट केले जात होते. प्रत्येकाची जबाबदारी स्पष्ट असल्याने आम्हाला खूप फायदा झाला आहे.

    तर आजच्या प्लेईंग 11 बाबत बोलताना रोहित म्हणाला, सर्व 15 खेळाडूंकडे खेळण्याची संधी आहे. आज आणि उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर 12-13 खेळाडू निवडले जातील. पण प्लेईंग 11 अद्याप तयार नाही. सर्व 15 खेळाडू सामन्यासाठी तयार आहेत.

  • 19 Nov 2023 01:16 PM (IST)

    World Cup Final 2023 : यापूर्वी कपिल देव, गांगुली अन् धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने फायनल खेळली

    रोहितच्या आधी कपिल देव, सौरभ गांगुली आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठू शकला होता. कपिल (1983) आणि धोनी (2011) यांनी भारताला चॅम्पियन बनवले होते. तर गांगुलीच्या सेनेला 2003 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता रोहितच्या नेतृत्वात भारत चौथ्यांचा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्व कौशल्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

  • 19 Nov 2023 01:13 PM (IST)

    World Cup Final 2023 : स्पर्धेत सलग 10 सामने जिंकत टीम इंडिया अजिंक्य

    अंतिम फेरीपर्यंतच्या या प्रवासात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्याच्या स्पर्धेत सलग 10 सामने जिंकत टीम इंडिया अजिंक्य आहे. याशिवाय भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे, तर मोहम्मद शमी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. श्रेयस अय्यरनेही सलग दोन शतके झळकावली आहेत तर केएल राहुलने गंभीर प्रसंगी उत्कृष्ट खेळी केली आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे.

  • 19 Nov 2023 01:11 PM (IST)

    World Cup 2023 : फायनलपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर ‘ब्लू आर्मी’

    भारत-ऑस्ट्रेलिया फायनल मॅचपूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर इंडियन टीमला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)

Tags

follow us