Video : भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटतोय; बहुजन विकास आघाडीचा थेट आरोप, नालासोपारात तुफान राडा

  • Written By: Published:
Video : भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटतोय; बहुजन विकास आघाडीचा थेट आरोप, नालासोपारात तुफान राडा

Vinod Tawde Money Distribution video :विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (दि. २० नोव्हेंबर) रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पैसे वाटपाचा आरोप सुरु झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उबाठाने आरोप केला आहे. तसंच, नालासोपारा येथे बहुजन विकास आघाडीने भाजपवर पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. (Vinod Tawde ) या ठिकाणी भाजप नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आहे.

काय घडलं?

पैसे वाटप करण्याचा आरोपावरुन नालासोपारा येथे भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाला. भाजप केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यासह नालासोपारा येथील भाजप उमेदवार राजन नाईक यांना हॉटलमध्ये घेरले. त्यावेळी दोन्ही गटात तुफान राडा झाला आहे. विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत हॉटलमध्ये हा प्रकार झाला आहे. विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी विनोत तावडे यांना जाब विचारला. तुम्ही या ठिकाणी का आलात? असा प्रश्न विचारला. भाजपकडून विनोद तावडे कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले असल्याचं सांगितलं.

मराठवाड्यात निवडणूक पथकाची मोठी कारवाई; हिंगोली, वसमतमध्ये २१ लाख पकडले

विनोद तावडे यांनी पैसे आणले होते, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केली. त्या ठिकाणी त्यांची डायरी आणि लॅपटॉप मिळाल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी माध्यामांशी बोलताना सांगितल आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात बोटाला शाही लावून पैसे वाटप करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. फेसबुक पोस्ट करत त्यांनी हा आरोप केला. बोटाला शाही लावून मतदान कार्ड जमा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जवाहर नगर पोलिसांनी 18 लाख जमा केल्याचा पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. आमदार संजय शिरसाठ यांच्या सांगण्यावरून 2 कोटी रुपये पोलिसांनी सोडल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

हे कट कारस्थान

विनोद तावडे हे पैशांची बॅग घेऊन गेले आणि पैसे वाटत करत असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विनोद तावडे यांनी मतदारांना वाटण्यासाठी 15 कोटी आणल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. मला जाऊ द्या, मला माफ करा अशी विनंती करणारे 25 फोन आपल्यला केल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी सर्व आरोप फेटाळे आहे.

मतदारसंघात पैसे वाटपाचे कार्यक्रम हे पूर्वनियोजित कटकारस्थान आहे. जाणीवपूर्वक व्हिडिओ काढला आहे. आमचा यात संबंध नाही. पोलिसांनी त्याची चौकशी करावी. पराभव दिसत असल्याने ते असले व्हिडिओ फिरवत आहे. 2 कोटी सोडले तर तपास करा ना, असं आव्हान संजय शिरसाठ यांनी दिलं आहे. दरम्यान, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की मला पाफ करा म्हणून विनोद तावडे यांनी फोन केले असंही सांगिंतलं आहे. त्यामळे वातावरण तापल्याचं सध्याचं चित्र आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube