नाना पटोलेंना आरएसएसचा एजंट म्हणे भोवणार; बंटी शेळकेंचे काँग्रेसमधून निलंबन होणार ?

  • Written By: Published:
नाना पटोलेंना आरएसएसचा एजंट म्हणे भोवणार; बंटी शेळकेंचे काँग्रेसमधून निलंबन होणार ?

Congress notice to Bunty Shelke : विधानसभा निवडणुकीत नागपूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसचे (Congress) उमेदवार बंटी शेळके ( Bunty Shelke) हे पराभूत झाले होते. या पराभवानंतर बंटी शेळके यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर जोरदार घणाघात करत मोठा आरोप केला होता. नाना पटोले हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) एजंट असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता. हे प्रकरण पक्षाने गांभीर्याने घेतले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रशासन व संघटनेचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ऋषिकेश उर्फ बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. या नोटीशीवर बंटी शेळके यांना दोन दिवसांमध्ये उत्तर द्यायचे आहे.

PM मोदींच्या उपस्थितीतीत गुरुवारी शपथविधी सोहळा पण CM पदाचं नाव अजूनही गुलदस्त्यात

दोन दिवसांपूर्वी टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर टिळक भवन परिसरात माध्यमांशी बोलताना बंटी शेळके यांनी काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बदनामी केली. तुमचे हे कृत्य पक्षशिस्तीचा भंग करणारे असल्याने आपल्याला काँग्रेस पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये, याबाबत आपला लेखी खुलासा दोन दिवसांत प्रदेश कार्यालयात सादर करावा. खुलासा न दिल्यास आपल्याला काहीही म्हणून नाही असे सांगून पक्षातून निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असे नोटीशीमध्ये म्हटले आहे.

मोठी बातमी : अरविंद केजरीवालांच्या सुरक्षेत मोठी चूक, ग्रेटर कैलासमध्ये हल्ला; पाहा व्हिडिओ

हस्तक्षेप करून मला उमेदवारी देण्यात आलीय. हे नाना पटोले यांना पटले नाही, त्यामुळे आपल्या विश्वासातील काही नेते आणि कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांना त्यांनी मदत केल्याचे आरोप बंटी शेळके यांनी केला होता.


काय म्हणाले होते शेळके

मला पक्षानं चिन्ह दिलं जी थोडीफार ताकद आहे तीही दिली. तरी सुद्धा मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढलो. माझ्या आणि शेळके परिवाराच्या रक्ताच्या थेंबाथेंबात काँग्रेस आहे आणि यात काहीच शंका नाही. 2019 मध्ये फक्त चार हजार मतांच्या फरकाने मी निवडणुकीत पराभूत झालो होतो. पण शहरातील जे मोठे नेते आहेत त्यांच्याकडून अशी अफवा पसरवण्यात आली की याला तिकीट मिळणार नाही. एका हॉटेलमध्ये काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना बोलावण्यात आलं. तिथं नेमकं काय घडलं याची कल्पना नाही. पण निवडणुकीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच नेते आणि कार्यकर्ते आमच्याबरोबर होते. पण बाकीचे सर्वच जण पश्चिम नागपुरात होते. पश्चिम नागपुरात विकास ठाकरे निवडणूक जिंकले. सर्वे रिपोर्टच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही निवडणूक जिंकत होतो. पण एक वेगळ्या प्रतीचं स्नेह त्यांचं माझ्याप्रति आहे, अशा सूचक शब्दांत बंटी शेळके यांनी इशाराही दिला. 2019 मध्ये मी निवडणुकीत पराभूत झालो होतो. पॅनलमध्ये देखील माझं नाव नव्हतं. चार हजार मतांनी जर एखादा उमेदवार निवडणुकीत पराभूत झाला असेल तर पॅनलमध्ये सर्वात अगोदर त्याचच नाव असतं. 2019 ते 2024 पर्यंत या गोष्टी घडत गेल्या. मात्र त्यानंतरही मी ही निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढलो. मतदारांपर्यंत पोहोचलो. त्यांनी आशीर्वाद म्हणून मला 80 हजार मते दिली. मी या सर्व गोष्टी पक्ष नेत्यांच्या कानावर घातल्या आहेत. तुम्ही मला पक्ष चिन्ह दिलं पण संघटन मात्र दिलं नाही. स्थानिक पातळीवरील काँग्रेसने जर पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली असेल. निवडणूक काळात जे ते लोकं कुठे सहभागी झाली नसतील या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. या सर्वांवर पक्षाने स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे अशी मी माझी बाजू मांडल्याचे बंटी शेळके म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube