Video : EC म्हणजे कुत्रा; टीकेच्या ओघात काँग्रेस नेते भाई जगतापांचे बोल बिघडले
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता ईव्हीएमवरून राजकारण तापले आहे. या पराभवाचे खापर विरोधी पक्षांचे नेते ईव्हीएमवर फोडत असतानाच काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी निवडणूक आयोगाची (Election Commission) तुलना कुत्र्यासोबत केली आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून, सोशल मीडियावर यूजर्सने जगताप यांचा जोरदार क्लास घेत विरोधक जिंकल्यावर बोलत नाहीत आणि हरले की ईव्हीएमला दोष देऊ लागतात. (Congress Leader Bhai Jagtap Controversial Statement Over ECI )
“आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही हीच आमची..” EVM वर शरद पवारांचाही अविश्वास
निवडणूक आयोग तर कुत्रा आहे. पण लोकशाहीला सशक्त बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या सगळ्या संस्था कुत्रा बनून नरेंद्र मोदींच्या दारासमोर बसतात, असं भाई जगताप म्हणाले. लोकशाही बळकट करण्यासाठी आयोगाची निर्मिती केली आहे, मात्र दुर्दैवाने त्याचा गैरवापर करून आज देशभरात जे घोटाळे होत असल्याचे ते म्हणाले.
VIDEO : उठाव केला पाहिजे, अन्यथा… लोकशाही धोक्यात; शरद पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट
जगताप म्हणाले की, मी ४५-४७ वर्षांपासून राजकारणात असून, सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत वेगळा निर्णय येतो, जनतेचा निर्णय येतो आणि अचानक या सर्व गोष्टी घडतात. हा सर्व ठरवून केलेला खेळ आहे. त्यामुळे बॅलेट पेपर आलेच पाहिजेत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
भाई जगताप यांच्या वक्तव्यापूर्वी काँग्रेस पक्षानेही महाराष्ट्रातील पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.
‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ अशी कोणतीही संकल्पना संविधानात नाही ; असीम सरोदे
दरेकरांकडून जशास तसे उत्तर
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही या विधानावरून भाई जगताप यांच्यावर निषाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाचाळवीरांसारखं बोलणं सुरू आहे. त्यामुळे तेच भुंकताना दिसताहेत. भुंकण्यासारखी त्यांची वक्तव्यं आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना त्यादृष्टीनं तसंच दिसणार असे दरेकर म्हणाले.
Mumbai: Congress leader and MLC Bhai Jagtap on Maharashtra Election results says, "(Election Commission toh Kutta hai) The Election Commission is like a dog, acting as a dog, sitting outside Narendra Modi ji's bungalow. All the agencies that were created to strengthen our… pic.twitter.com/EMgFlX6jJm
— IANS (@ians_india) November 29, 2024