महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे? ‘या’ हाय व्होल्टेज लढती ठरणार महत्वाच्या, वाचा सविस्तर

महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे? ‘या’ हाय व्होल्टेज लढती ठरणार महत्वाच्या, वाचा सविस्तर

Mahayuti Vs Mahavikas Aghadi High Voltage Fight : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) मतदानाची प्रक्रिया काल 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. आता सर्वाचं लक्ष 23 नोव्हेंबरकडे लागलंय. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आता मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय, याची सर्वांना उत्सुकता (Mahayuti) आहे. राज्यात तुरळक अपवाद वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडलंय. राज्यातील काही भागात हायव्होल्टेज लढती पाहायला मिळाल्या आहेत. मतदानानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. परंतु अनेकदा हे अंदाज देखील फसवे ठरतात. संपूर्ण महाराष्ट्राचं (Mahavikas Aghadi) लक्ष लागलेल्या हायव्होल्टेज फाईट्स कोणत्या होत्या, हे आपण जाणून घेऊ या.

मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोपरी पाचपाखाडीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे केदार दिघे मैदानात आहेत. त्यानंतर माहिम विधानसभा मतदारसंघाकडे देखील बिग फाईट म्हणून पाहिलं जातंय. तिथे मनसेचे अमित ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. याच मतदारसंघात महेश सावंत देखील रिंगणात आहेत.

वरळीत अन् ठाण्यात देखील तिहेरी लढत पाहायला मिळाली. वरळीत शिंदे गटाचे मिलिंद देवरा, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे संदीप देशपांडे आपलं नशीब आजमावत आहेत. दुसरीकडे वांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी लढत झाली आहे. ठाण्यात शिंदे गटाचे संजय केळकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेच्या अविनाश जाधव यांच्यात अटीतटीची लढत झाली. तर कोकणात कुडाळमध्ये निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक असा सामना रंगला.

यमुना एक्स्प्रेस वेवर बसची ट्रकला धडक; 5 ठार, 15 हून अधिक जण जखमी

बारामती, कागलच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी फाईट म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी ‘काका-पुतण्यांची थेट लढत झाली.तर मावळमध्ये सुनिल शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी थेट लढत झाली. यानंतर सगळ्यात हाय व्हॉल्टेज लढत कागल विधानसभा मतदारसंघातली होती. दोन कट्टर विरोधक, राष्ट्रवादीतून हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या पक्षाकडून समरजीत घाटगे आमने-सामने आहेत. या मतदारसंघात 81 टक्क्यांहून अधिक मतदान झालंय.

कोल्हापूर उत्तर अन् सांगोल्यात कुणाची बाजी?
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला. तेथे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली आणि काँग्रेसने अपक्ष राजू लाटकर यांना पाठिंबा दिला. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी खुद्द एकनाथ शिंदे यांनी फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे. सांगोल्यात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे दीपक साळुंखे यांच्यात चुरशीची लढत आहे.

एक्झिट पोलची आकडेवारी येताच फडणवीस संघ कार्यालयात दाखल, मोहन भागवतांशी राजकीय खलबतं…

सांगलीच्या कवठेमहांकाळ विधानसमभा मतदारसंघात ‘संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील’ ही देखील एक बिग फाईट आहे.कर्जत जामखेडच्या हाय व्होल्टेज लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली. जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यात थेट लढत झाली.

नांदगावमध्ये राडा

नांदगावमध्ये मात्र हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. तेथे सुहास कांदे, गणेश धात्रक अन् समीर भुजबळ ही तिहेरी लढत पाहायला मिळाली सुहास कांदेंनी ‘तुझा मर्डर फिक्स आहे’ अशी थेट धमकीच समीर भुजबळांना दिल्याचं समोर आलं. मराठवाड्यात परांडा विधानसभेत तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे लढत झाली. तर बार्शी मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या राजेंद्र राऊत यांच्यासमोर ठाकरे गटाच्या दिलीप सोपल यांचं कडवं आव्हान आहे. विदर्भातील रामटेकमध्ये आशिष जैस्वाल विरुद्ध विशाल बरबटे यांच्यात लढत आहे. विदर्भातील सावनेर विधानसभा मतदारसंघात आशिष देशमुखांविरोधात अनुजा केदार असा सामना रंगला आहे.

राज्यातील इतर महत्वाच्या बिग फाईट्स

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – गुलाबराव पाटील विरूद्ध गुलाबराव देवकर
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ – चंद्रकांत पाटील विरूद्ध रोहिणी खडसे
मालेगावर बाह्य विधानसभा मतदारसंघ – दादा भुसे विरूद्ध अद्वय हिरे
येवला विधानसभा मतदारसंघ – छगन भुजबळ विरूद्ध माणिकराव शिंदे

राजापूर विधानसभा मतदारसंघ – किरम सामंत विरूद्ध राजन साळवी
कुडाळ विधानसभा मतदारसंघ – निलेश राणे विरूद्ध वैभव नाईक
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ – दीपक केसरकर विरूद्ध राजन तेली
कणकवली विधानसभा मतदारसंघ – नितेश राणे विरूद्ध संदेश पारकर

बेलापूर विधानसभा मतदारसंघ – मंदा म्हात्रे विरूद्ध संदीप नाईक
ऐरोली विधानसभा मतदारसंघ – गणेश नाईक विरूद्ध एम के मढवी वि. विजय चौगुले
मिरा भायंदर विधानसभा मतदारसंघ – नरेंद्र मेहता विरूद्ध गीता जैन

इंदापूर विधानसभा मतदारसंघ – दत्ता भरणे विरूद्ध हर्षवर्धन पाटील
आंबेगाव विधानसभा मतदारसंघ – दिलीप वळसे पाटील विरूद्ध देवदत्त निकम
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ – अमल महाडिक विरूद्ध ऋतुराज पाटील
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ – समाधान औताडे विरूद्ध भगिरथ भालके

लातूर विधानसभा मतदारसंघ – अर्चना पाटील चाकूरकर विरूद्ध अमित देशमुख
जालना विधानसभा मतदारसंघ – अर्जुन खोतक विरूद्ध कैलास गोरंट्याल
भोकरदन विधानसभा मतदारसंघ – संतोष दानवे विरूद्ध चंद्रकांत दानवे
कन्नड विधानसभा मतदारसंघ – संजना जाधव विरूद्ध हर्षवर्धन जाधव
परळी विधानसभा मतदारसंघ – धनंजय मुंडे विरूद्ध राजेसाहेब देशमुख

दिंडोशी विधानसभा मतदारसंघ – संजय निरुपम विरूद्ध सुनिल प्रभू
मानखूर्द -शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ – नबाव मलिक विरूद्ध अबु आझमी
शिवडी विधानसभा मतदारसंघ – बाळा नांदगावकर विरूद्ध अजय चौधरी
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ – शायना एनसी विरूद्ध अमिन पटेल
अणुशक्तिनगर विधानसभा मतदारसंघ – सना मलिक विरूद्ध फहाद अहमद
दिग्रस विधानसभा मतदारसंघ- संजय राठोड विरूद्ध माणिकराव ठाकरे

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube