Mahavikas Aghadi : खुर्चीचा वाद मिटला, नेत्यांची एकाच वेळी एन्ट्री
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विशेष खुर्ची देण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. यावेळी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सावधगिरी बाळगत खुर्च्यांचा वाद टाळला आहे.
महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा आज नागपूरमध्ये संपन्न झाली. सभेला सुरुवात झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी एकाच वेळी एन्ट्री केली. यावेळी सर्व नेत्यांना सारख्याचं खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. पहिल्या रांगेत मोठे होते. त्यानंतर दुसऱ्या रांगेत तिन्ही पक्षातील इतर नेत्यांसाठी सोय करण्यात आली होती.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये खुर्चीवरुन राजकारण सुरु झाल्यानंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे वेगळी खुर्ची देण्यात आली होती, असे अजित पवार यांनी सांगितले होते. तर महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी खुर्ची दिली, त्यांचा राजेशाङी थट होता. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नामोनिशाण दिसत नव्हता, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती.
नाना पटोलेंवर जगदीश मुळीक बरसले! म्हणाले तोंडाच्या वाफा टाकणाऱ्यांनी…
नागपूरच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत आली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना फक्त महाराष्ट्रावरच नाही जगावर कोरोनाचे संकट आले होते. पण, तेव्हा माझ्यावर टीका करायचे नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार पाडून आलेले शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज्यावर संकटेच संकटे येत आहेत. त्यामुळे हे उलट्या पायाचे सरकार राज्यात आले, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.