एक्झिट पोलची आकडेवारी येताच फडणवीस संघ कार्यालयात दाखल, मोहन भागवतांशी राजकीय खलबतं…

  • Written By: Published:
एक्झिट पोलची आकडेवारी येताच फडणवीस संघ कार्यालयात दाखल, मोहन भागवतांशी राजकीय खलबतं…

Devendra Fadnavis Met Mohan Bhagwat : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) आज मतदान पार पडले. आता विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे (Exit polls) आकडे समोर आलेले असताना दुसरीकडे मात्र राज्यातील भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis)  संघ मुख्यालयात (RSS) दाखल झालेत.  मतदान संपताच फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची भेट घेतली.

उत्तर महाराष्ट्रात गुलाल कुणाचा? महायुती की मविआ? एक्झिट पोलचा अंदाज काय.. 

विधानसभा निवडणुकीत संघाच्या सक्रिय मदतीमुळे मतदानाची टक्केवारी वाढली. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मतदानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विविध बुथवर जाऊन भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन माहिती घेतली. सायंकाळी मतदान संपल्यानंतर फडणवीस यांनी अचानक संघ मुख्यालय गाठून सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. फडणवीस यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी पंधरा ते वीस मिनिटे चर्चा केल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाल्यानंतर अचानक घेतलेल्या या भेटीमुळे एक वेगळं महत्व प्राप्त झालं.

Exit Poll : राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? एक्झिट पोलमध्ये मनसेला किती जागा? 

संघाने विधानसभा निवडणुकीत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार केला. भाजपला बूथनिहाय समन्वयक दिले. त्याचबरोबर स्वयंसेवकांना सामाजिक समतोल साधीत घटना बदलण्याच्या नॅरेटिव्हची धार बोथ केली. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. याचा फायदा भाजपसह महायुतीला होणार आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याची सुत्रांची माहिती आहे.

दरम्यान, जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजप आणि महायुतीला फायदा होतो, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. याशिवाय अनेक एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरासरी महायुतीचे पावणे दोनशेच्या जवळपास आमदार निडणूक येणार असून राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष होईल, असं सांगितलं जात आहे. मात्र, असं असलं तरी सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीचा मोठा कस लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube