Exit Poll : राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? एक्झिट पोलमध्ये मनसेला किती जागा?

  • Written By: Published:
Exit Poll : राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? एक्झिट पोलमध्ये मनसेला किती जागा?

Maharashtra Exit Poll : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election)आज मोठ्या उत्साहात मतदान झाले. राज्यातील दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यानुसार राज्यात महायुतीची (Mahayuti) सत्ता येण्याचा अंदाज दिसून येत असून महाविकास आघाडी सत्तेच्या जवळ-जवळ जात असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेला किती जागा मिळू शकतील, याबाबत काही अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

अजितदादांच्या राष्ट्रवादीला किती जागा, फटका की जलवा? वाचा, एक्झिट पोलचे आकडे 

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत राज्यभर अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरली होती. राज ठाकरे यांनी राज्याचा दौरा करून अनेक प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र, सर्व एक्झिट पोलनुसार मनसेला फारसे यश मिळताना दिसत नाही. दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार मनसेला 2 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

तर इलेक्टोरल एजनुसार, मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष इतर मिळून 20 जागा जिंकू शकतील असा अंदाज आहे. चाणक्य एक्झिट पोलनुसार अपक्ष, मनसे आणि वंचित उमेदवारांना 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी मनसेकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात मनसेची कामगिरी कशी राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. माहीमच्या जागेवरून अमित ठाकरे विजयी होणार का, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

चाणक्यचा पोल सांगतोय महायुतीचं सरकार
चाणक्य स्ट्रॅटेजीनेही महाराष्ट्र निवडणुकीचे अंदाज दिले आहेत. यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने व्यक्त केला आहे. सहा ते आठ जागा अपक्षांना आणि अन्य पक्षांना मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube