उत्तर महाराष्ट्रात गुलाल कुणाचा? महायुती की मविआ? एक्झिट पोलचा अंदाज काय..

उत्तर महाराष्ट्रात गुलाल कुणाचा? महायुती की मविआ? एक्झिट पोलचा अंदाज काय..

Exit Polls 2024 : यंदाची विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीचं भवितव्य ठरविणारी आहे. काल राज्यभरात 64 टक्क्यांच्या आसपास मतदान झालं. मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल्सचे अंदाज येण्यास सुरुवात झाली. काही संस्थांनी महायुतीचं तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थानापन्न होईल असा अंदाज लावला. आता खरं चित्र तर शनिवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. मात्र, त्याआधी या एक्झिट पोल्सने उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा काय मूड आहे याचा आढाव घेऊ या.. 

उत्तर महाराष्ट्रात अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे पाच जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यांत एकूण 47 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहण्यास मिळाली. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीला जोरदार धक्का बसला होता. तशीच परिस्थिती आता राहिल का असा सवाल उपस्थित होत होता. एक्झिट पोल्समधून मात्र महायुती आणि महाविकास आघाडीत फिफ्टी फिफ्टी सामना होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे.

पुण्यात कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? वाचा, एक्झिट पोलचा कल

एसएएस ग्रुप हैदराबादच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला एकूण 15 ते 16 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 18 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अन्य पक्षांना दोन जागा मिळतील. या संस्थेच्या एक्झिट पोल्सनुसार महायुती महाविकास आघाडीपेक्षा सरस कामगिरी करताना दिसत आहे. मात्र दोन्हींच्याही जागांमध्ये फारसा फरक दिसत नाही.

लोकशाही रुद्रने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात भाजपला 14, शिंदे गटाला 6, अजित पवार गटाचे उमेदवार 4 मतदारसंघात विजयी होण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला 6, ठाकरे गटाला 6 आणि शरद पवार गटाला 8 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या एक्झिट पोलनुसार उत्तर महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. महायुतीचा विचार केला तर पाच जिल्ह्यांत महायुतीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला 20 पर्यंत जागा मिळतील अशी शक्यता आहे.

झी एआयच्या पोलनुसार उत्तर महाराष्ट्रात महायुतीला 15 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीलाही 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पोलचा विचार केला तर दोन्ही आघाड्यांना समसमान जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत महायुती आणि महाविकास आघाडीत कांटे की टक्कर होईल असेच अंदाज समोर आले आहेत.

उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जलवा; भाजपला-शिंदेंना सहा जागांचा फटका

लोकसभेतील पराभवानंतर मायक्रो प्लॅनिंग

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर उत्तर महाराष्ट्रात महायुतीची दाणादाण उडाली होती. या भागातील सहा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा मोठा पराभव झाला होता. जळगाव आणि रावेर या दोन मतदारसंघांनी नामुष्की थोडीफार टाळली होती. नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर दक्षिण, शिर्डी, दिंडोरी या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला होता. या पराभवातून महायुतीने धडा घेतला. उत्तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं. त्यामुळे एक्झिट पोल्समध्ये येथील चित्र महायुतीसाठी आशादायक झाल्याचं दिसून येत आहे. पाच जिल्ह्यातील 47  विधानसभा मतदारसंघांपैकी निम्म्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज बहुतेक एक्झिट पोल्समधून समोर आला आहे.

राज्यात पुन्हा महायुती सरकार?

पोल डायरी Exit Poll

महायुती – 122 ते 186

भाजप – 77 ते 108
शिवसेना (शिंदे गट) – 27 ते 50
राष्ट्रवादी (अजित पवार) – 18 ते 28

मविआ – 69 ते 121
काँग्रेस – 28 ते 47
शिवसेना (ठाकरे गट) – 16 ते 35
राष्ट्रवादी (शरद पवार) – 25 ते 39
इतर – 12 ते 29

चाणक्य एक्झिट पोल

महायुती – 152 ते 160

भाजप – 90
शिवसेना (शिंदे गट) – 48
राष्ट्रवादी (अजित पवार) – 22

मविआ – 130 ते 138
काँग्रेस – 63
शिवसेना (ठाकरे गट) – 35
राष्ट्रवादी (शरद पवार) – 40
इतर – 6 ते 8

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube