Download App

राष्ट्रवादीची भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट, मी किंवा राष्ट्रवादीने…; मलिकांनी थेट सांगितलं…

राष्ट्रवादीने भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट केलीये, मी किंवा राष्ट्रवादी पक्षाने विचारांशी तडजोड केलेली नाही, असं मलिक म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Nawab Malik : भाजपच्या (BJO) तीव्र विरोधानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून नवाब मलिक (Nawab Malik) यांना उमेदवारी दिली. अजित पवारांच्या या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. दरम्यान, काल मलिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेवदारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीवर मोठं विधान केलं.

सेम टू सेम! पुण्यातील पर्वती मतदारसंघात एकाच नावाच्या उमेदवाराचे तीन अर्ज

राष्ट्रवादीने भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट केलीये, मी किंवा राष्ट्रवादी पक्षाने विचारांशी तडजोड केलेली नाही, असं मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, जनतेच्या विनंतीवरून मी मानखुर्द शिवाजी येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. पण याच मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं आपला उमेदवार उभा केला आणि भाजप शिंदेसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांना समर्थन देत आहेत. मला भाजपकडून विरोध होत असेल, तर काळजी करण्याचे कारणच नाही आणि राहिला प्रश्न भाजपचा तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी केवळ राजकीय अॅडजस्टमेंट केलीय. मी किंवा राष्ट्रवादीने विचारांशी तडजोड केलेली नाही, असं ते म्हणाले.

Pune Firing News: मोठी बातमी! पुण्यात पुन्हा गोळीबार, परिसरात खळबळ

पुढं ते म्हणाले, आम्हाला हे अपेक्षितच होतं की भाजपकडून मला विरोध केला जाणार, माझ्या मुलीच्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातही काही वेगळी स्थिती नाही. असं असेल तरी आम्ही या दोन्ही जागा आम्ही मोठ्या फरकाने जिंकू, असं मलिक म्हणाले.

अजितदादांशिवाय सरकार बनू शकत नाही…
ते म्हणाले, आमची विचारधारा स्पष्ट आहे, आमचा धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे. राहिला हा निवडणुकीचा तर ही लढत अटीतटीची होणार. आणि महाराष्ट्रातील कोणतेही सरकार अजित पवार यांच्याशिवाय बनू शकत नाही, तसंच अजित पवार आपल्या विचारांशी तडजोड करु शकत नाही, असंही मलिक म्हणाले.

follow us