Download App

आईच्या पराभवाचा वचपा काढला आणि थेट मंत्री; प्राजक्त तनपुरेंचा राजकीय प्रवास

पहिल्यांदा विधानसभा लढले व पहिल्याच टर्म मध्ये त्यांनी आमदारकीची गवसणी घातली . महाआघाडी सरकरामध्ये ते राज्यमंत्री झाले.

  • Written By: Last Updated:

Political Journey of Prajakt Tanpure: राज्यात अनेक मातब्बर राजकारणी होऊन गेली आहेत. मात्र काहींनी राजकारणात आपल्या कामाद्वारे एक वेगळा ठसा निर्माण केलाय. यातच सध्या आपल्या कार्यामुळे चर्चेत असलेले एक नाव म्हणजे राहुरी मतदार संघाचे (Rahuri Assembly Constituency) शरद पवार गटाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे होय. प्राजक्त तनपुरे हे पहिल्यांदा विधानसभा लढले व पहिल्याच टर्म मध्ये त्यांनी आमदारकीची गवसणी घातली . त्यांनतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर तनपुरे हे राज्यातील मंत्री देखील झाले.एक तरुण मंत्री आणि आमदार म्हणून त्यांची जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली

माझ्या ‘राजाराणी’ चित्रपटावर अन्याय होतोय; सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या, सुरजची चाहत्यांना भावनिक साद


प्राजक्त तनपुरे यांचा परिचय

प्राजक्त तनपुरे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1976 रोजी झाला. ते उच्चशिक्षित असून त्यांनी बी. ई., एमबीए, एमएस या पदव्या घेतल्या आहेत. अमेरिकेतून शिक्षण घेणारे तनपुरे यांचे इंग्रजीसह मराठी व हिंदी भाषेवर चांगलंच प्रभुत्त्व आहे. तनपुरे यांचा राजकीय प्रवास हा राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच सुरू झाला. राहुरीचे नगराध्यक्ष असताना तनपुरे यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक लढवली. मातब्बर नेते म्हणून ओळख असलेले भाजपचे शिवाजीराव कर्डीले यांच्या विरोधात ते निवडणूक लढले व त्यांनी विजयाचा गुलाल देखील उधळला. तनपुरे यांना पहिल्यांदाच आमदार होताच मंत्रीपदाची लॉटरी लागली. त्यांची राज्याचे ऊर्जामंत्री म्हणून तनपुरे यांनी कारभार बघितला.


Video : राऊत सर्कशीतील जोकर; त्यांच्या… भाजप आमदार नितेश राणेंची खोलवर घाव करणारी टीका

मोठा राजकीय वारसा
राहुरी तालुका व तालुक्यातील आजूबाजूचा परिसर हा तनपुरे कुटुंबाचं होमग्राऊंडच समजलं जात. प्राजक्त तनपुरे यांचे आजोबा बाबूरावदादा तनपुरे हे 1962 आणि 1967 या दोन निवडणुकांमध्ये राहुरी येथूनच आमदार राहिले होते. त्यापूर्वी म्हणजे 1954 साली स्थापन झालेल्या राहुरी साखर कारखान्याची स्थापना करण्यात बाबूरावदादा तनपुरेंचा मोठा वाटा होता. सहकार क्षेत्रात बाबूरावदादांचा आजही आदरानं उल्लेख केला जातो. आजोबानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या मुलाने म्हणजे प्रसाद तनपुरे यांनी चालविला. प्रसाद हे प्राजक्त तनपुरेंचे वडील. प्रसाद तनपुरे हेही राजकारणात अनेक वर्षे सक्रीय होते. एकदा खासदार आणि पाचवेळा आमदार अशी मोठी कारकीर्द त्यांनी संसदीय राजकारणात घालवली. आजोबा बाबूरावदादा तनपुरे आणि वडील प्रसाद तनपुरे यांच्याकडून प्राजक्त तनपुरेंना राजकीय वारसा मिळाला.

follow us