Download App

कर्डिले समर्थकांकडून राहुरी जाम! जोरदार शक्तिप्रदर्शन अन् रेकॉर्डब्रेक गर्दीत दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज…

उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा जनसमुदाय पाहता 23 तारखेला विजयाची वाट पाहण्याची गरज नसल्याचा फुल्ल कॉन्फिडन्स राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केलायं.

Shivajiro Kardile News : उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा जनसमुदाय पाहता 23 तारखेला विजयाची वाट पाहण्याची गरज नसल्याचा फुल्ल कॉन्फिडन्स राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajiro Kardile) यांनी व्यक्त केलायं. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र उमदेवार अर्ज भरीत आहेत. अशातच कर्डिले यांनी आज आपला दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केलायं. राहुरीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आलायं. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाहत्यांसाठी गुडन्यूज! ‘धर्मवीर 2’चं जागतिक डिजिटल प्रीमियर लवकरच, ‘या’ तारखेपासून पाहता येणार ZEE5 वर

राहुरी मतदारसंघातून कर्डिले यांना पुन्हा महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवाजीराव कर्डिले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले, राहुरी विधानसभा मतदारसंघातून याआधीच महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जोरदार शक्तिप्रदर्शनात आज दुसऱ्यांदा अर्ज दाखल केलायं. यावेळी प्रचार रॅलीमध्ये ज्येष्ठांपासून ते तरुणांसह महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जमलेला जनसमुदाय पाहून येत्या 23 तारखेला विजयाची वाट पाहण्याची गरज वाटत नसल्याचं शिवाजी कर्डिलेंनी स्पष्ट केलंय.

भाजपला मुंबईत मोठा झटका; बोरिवलीत गोपाळ शेट्टींची बंडखोरी, शिंदेंचा नेताही अपक्ष लढण्याच्या तयारीत

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख असून 4 नोव्हेंपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. अशातच सर्वच पक्षांकडून उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे विद्यमान आमदार आहेत. कर्डिलेंना पुन्हा उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीमध्ये सक्रिय असलेले धनराज गाडे आणि भास्करराव गाडे यांनी भाजपात प्रवेश केल्याने राहुरीत राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलंय.

संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीला झटका; उमेदवाराचा निवडणूक लढवण्यास नकार

कर्डिले गटामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. भाजपने 2019 नंतर पुन्हा शिवाजी कर्डिले यांना तिकीट दिलंय. विरोधामध्ये शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. त्यामुळं राहुरीत पुन्हा कर्डिले आणि तनपुरे यांच्यातच अटीतटीचा सामना होणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये 2019 च्या पराभवाचा वचपा कर्डिले काढणार का? हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे.

follow us