Download App

मनसेचे दोनही आमदार निवडूण येणार नाहीत अन् मशिदीवरील भोंग हटणार नाहीत…; आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं

मशिदीवरील भोंग कधीही हटरणार नाहीत आणि मनसेची सत्ता कधीच येणार नाही, अशा शब्दात आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं.

  • Written By: Last Updated:

Ramdas Aathawale : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) प्रचाराला सुरूवात झाली आहे. अमरावती येथील जाहीर सभेत बोलतांना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसेच्या हाती सत्ता दिली तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. आता रिपब्लिनक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनीही यावर प्रतिक्रिया देतांना राज ठाकरेंना डिवचंलं.

Bapusaheb Pathare : ‘तुतारी’च्या निनादात बापुसाहेब पठारेंचा स्वागत अन् औक्षण… 

मशिदीवरील भोंग कधीही हटरणार नाहीत आणि मनसेची सत्ता कधीच येणार नाही, अशा शब्दात आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं.

रामदास आठवलेंनी एएनआयशी संवाद साधला. यावेळी बोलताना आठवलेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, राज ठाकरे अनेकदा अशाप्रकारेच विधान करत असतात. आमचे सरकार आले तर मशिदीवरील भोंगे हटवणार असं ते म्हणतात. पण, मशिदीवरील भोंगे हटणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येऊ शकत नाही. कितीही वर्षे गेले तरी राज ठाकरेंची सत्ता येऊ शकत नाही. त्यांचा एकच आमदार निवडून येतो, तोही स्वत:च्या जीवावर. राज ठाकरेंच्या जीवावर नाही. मग त्यांचे सरकार कसे येणार आणि भोंगे कसे हटवू शकणार? असा सवाल आठवलेंनी केला.

‘भाजपने काय करावं हा त्यांचा प्रश्न, मी मलिकांचा प्रचार करणारच’, अजितदादा स्पष्टचं बोलले 

पुढं आठवले म्हणाले की, मी दहशतवादी असलेल्या मुसलमांनाचा नेहमीच विरोध केला आहे. पण, या देशावर, भारताच्य संविधानावर प्रेम करणारे आणि हिंदुंशी बंधुभाव राखून राहणाऱ्या मुसलमानांचा विरोध करणे ठीक नाही. मशिदीत एक-दोन मिनिटे अजान होत असते, त्यासाठी भोंगे हटवण्याची काय गरज आहे, असंही आठवले म्हणाले.

मनसेचे दोनही आमदार निवडून येणार नाहीत….
भोंगे हटवण्यापेक्षा गरीबी हटवा, भ्रष्टाचार हटवा, भोंगे हवटण्यापेक्षा विषमता, जातिवाद हटवला संपवला पाहिजे. केवळ 140-145 उमेदवार उभे करून आमदार निवडून येत नसता. मनसेचे दोनही आमदार निवडून येणार नाहीत. पण राज ठाकरे वारंवार अशी विधान करत राहिले तर माझा पक्ष भोंगा हटवणाऱ्यांना धडा शिकवणार, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, रामदास आठवलेंच्या या वक्तव्यावर आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us