Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) उद्धव ठाकरे गटाकडून (Thackeray Group Candiate List) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत एकूण 65 जणांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, या यादीत काही चुका असल्याचं समोर आलं. दरम्यान, यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाष्य केलं.
विधानसभेसाठी मविआचा अधिकृत फॉर्म्युला ठरला; पत्रकार परिषदेत घोषणा
शिवसेना मुख्यालयाच्या यादीमध्ये काही दुरूस्त्या आहेत. आमच्या पहिल्या यादीत काही मित्रपक्षांच्या जागांचाही समावेश आहे, असं म्हणत उमदेवार बदलाचे संकेत राऊतांनी दिले.
आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरला महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार, त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचे जागावाटप सुरळीत पार पडले आहे. राज्यातील सर्व जागांवरील जागावाटप पूर्ण झाले आहे. 270 जागांवर आमचे एकमत झाले आहे. उरलेल्या काही जागांवर आम्ही मित्रपक्षांशी चर्चा करणार आहोत, असं ते म्हणाले.
कोपरगावचा वाद मिटला! कोल्हे कुटुंबियांनी घेतली अमित शहांची भेट, भेटीत चर्चा काय?
ठाकरे गटाच्या पहिल्या यादीविषयी बोलतांना राऊत म्हणाले की, शिवसेना मुख्यालयाच्या यादीमध्ये काही दुरूस्त्या आहेत. ते कशाप्रकारे झालं, काय झालं, आमची प्रशासकीय चूक कशी काय होऊ शकली, याबाबत आमचे बोलतील. ते या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. उद्या आम्ही एकत्र येणार आहोत. त्यावर नव्याने काही चर्चा होईल, असं राऊत म्हणाले.
आमची जी यादी चुकून आली, त्यात शेकापच्या काही जागा आहे. त्यावर शेकापची चर्चा सुरू आहे. काही जागा राष्ट्रवादीकडे तर एखादी दुसरी जागा कॉंग्रेसकडे आहे. त्यावर चर्चा होईल, असं म्हणत यादीतील काही उमेदवार बदलले जाऊ शकतात, असे संकेत राऊतांनी दिले.
दरम्यान, आमचे जागावाटप पूर्ण झाले. तिन्ही पक्ष 85-85-85 अशा 270 जागा लढवणार आहेत. उर्वरित ज्या जागा आहेत, ते आमच्या मित्रपक्षांच्या आहेत. 288 जागांचा प्रश्न निकाली निघाला असं आम्ही सांगतोय, ते अत्यंत जबाबदारीने सांगतो. 18 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. त्यात आमच्यातील कुणाचा दावा असला तर त्यातून काही मार्ग काढला जाईल, असंही स्पष्ट करत महाविकास आघाडी 288 जागा लढवून राज्यात सत्तेवर येईल, असा विश्वास राऊतांना व्यक्त केला.
पहिली यादी अंतिम नाही?
पहिल्या यादीबाबत पत्रकारांनी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांना विचारले असता, ज्या जागांवर ज्या काही दुरूस्त्या असतील, त्या करून उद्या चित्र स्पष्ट होईल, असं ते म्हणाले.