मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीसाठी वंचितची दुसरी यादी जाहीर; सर्वच मुस्लिम उमेदवारांना संधी
मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election) राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू आहे. यातत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) 21 सप्टेंबर रोजी पहिली यादी जाहीर केली होती. यात 11 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आज (दि.9) वंचितकडून आणखी 10 जणांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. यात पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघातील उमेदवारीचाही समावेश आहे. जाहीर करण्यात आलेल्या आजच्या यादीत मुस्लिम समाजातील इच्छूकांना संधी देण्यात आली आहे. (Vanchit Bahujan Aghadi Second List For Maharashtra Assembly Election)
जागावाटपाचा पेपर महायुतीने सोडवला आता फक्त…; फडणवीसांनी सगळं-सगळं सांगितलं
दुसऱ्या यादीत कुणा-कुणाला मिळाली संधी
वंचितकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मलकापूरमधून शहजादे खान सलीम खान, बाळापूर – खतीब सैय्यद नातीकोद्दीन, परभणी – सय्यद समी सय्यद साहेबजान, औरंगाबाद मध्य – मो. जावेद मो.इसाक, गंगापूर – सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर, कल्याण पश्चिम – अयाज गुलजार मोलवी, हडपसर – अॅड. मोहम्मद उपरोज मुल्ला, माण – इम्तियाज जाफर नदाफ, शिरोळ – आरिफ मोहम्मद अली पटेल तर, सांगली विधानसभा मतदारसंघातून आल्लाउद्दीन हयातचाँद काजी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने विधानसभा निवडणूक २०२४ साठी घोषित करण्यात आलेले उमेदवार.#VoteForVBA #VoteForGasCylinder #VBAforIndia pic.twitter.com/WwUQS8x2gm
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 9, 2024
रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात
वंचितने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात उतरवलं आहे. शमिभा पाटील असे वंचितच्या रावेर मतदारसंघातून लढणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. शमिभा भानुदास पाटील या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून, तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत. त्या 2019 पासून वंचित बहुजन आघाडी सोबत सक्रिय असून काम करत आहेत. शमिभा पाटील या लेवा पाटील समाजातील आहेत.
पहिल्या यादीत यांना मिळाली संधी
– रावेर – शमिभा पाटील
– शिंदखेड राजा – सविता मुंढे
– वाशिम – मेघा किरण डोंगरे
– धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
– नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे
– साकोली – डॉ. अविनाश नान्हे
– नांदेड दक्षिण- फारुख अहमद
– लोहा – शिवा नारांगले
– औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे
– शेवगाव – किसन चव्हाण
– खानापूर – संग्राम कृष्णा माने